‘त्या’ सर्वेक्षणामुळे शिवसैनिक धास्तावले !

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – अंतर्गत गटबाजीला पूर्णविराम देण्यासाठी शहर शिवसेनेत ‘झाडाझडती’ सुरु झाली आहे. ज्यांनी पदे भूषवली, त्यांनी कोणती कामे केली, जनतेच्या कोणत्या समस्यांसाठी आक्रमकपणा घेतला यासह जनमानसात त्यांची प्रतिमा काय याचा आढावा आता घेण्याचे काम सुरु झाले आहे. मात्र ते अत्यंत गोपनीय पद्धतीने ‘वरच्या पातळी’वर सुरु झाल्याची चर्चा असल्याने शिवसैनिक धास्तावले आहेत.

लोकसभा निवडणुकीत भाजपच्या खांद्याला खांदा लावून शिवसेनेने पुणे लोकसभेसाठी काम केले; पण प्रचारात भाजपने दुय्यम वागणूक दिल्याचा आक्षेप सेनेच्या काही पदाधिकाऱ्यांनी घेतला होता. त्यातही लोकसभा निवडणुकीच्या प्रचारावरूनही शिवसेनेत मानापमानाचे नाट्य घडल्याची चर्चाही होती. विधानसभा निवडणुकीवरून शिवसेनेने आठही मतदारसंघात मोर्चेबांधणी सुरु केली आहे; पण त्यात मोठ्याप्रमाणावर आधीपासूनच गटबाजी असल्याचे लक्षात आल्याने गटतट मोडून काढण्याचे आदेश थेट मुंबईतून काढण्यात आले आहेत. त्यातही काही बाहेरच्या इच्छुकांबरोबर आमदारकीची ‘डील ‘ करण्याच्या प्रकाराची चर्चा रंगली आहे. त्यामुळे एका राजकीय विश्लेषकाच्या टीमकडून आठही मतदारसंघात सर्वेक्षण करण्यात आले आहे. त्यानुसार शिवसेनेत आता ‘बदला’चे वारे दिसत आहे.

त्यातही आठही मतदारसंघात भाजपचे आमदार असल्याने आणि आता विधानसभा निवडणुकीसाठी कोणते मतदारसंघ शिवसेनेला मिळतात यानुसार रणनीती आखली जात आहे, त्याचाच एक भाग म्हणून सध्या सर्वेक्षण सुरु आहे मात्र ते जनमानसाचा कौल घेणारे नसून अन्य पक्ष आणि शिवसेनेशी संबंधित व्यक्तींकडून इत्यंभूत माहिती गोळा केली जात आहे. त्यात पालिकेच्या कारभाराचीही चौकशी होणार आहे. कोण-कोणत्या ठरावाला मंजुरी देताना शिवसेनेच्या ‘कारभाऱ्यां’ची भूमिका काय होती हेही तपासले जाणार असल्याचे सूत्रांनी सांगितले आहे. हडपसर आणि कोथरूड विधानसभा मतदारसंघात मोठी गटबाजी असल्याचेही संबंधित ‘टीम’ने शिवसेनेच्या वरिष्ठांना निदर्शनास आणून दिले आहेत, त्यासाठी पुरावेही सादर करण्यात आले आहेत.

आरोग्यविषयक वृत्त

‘या’ १३ आरोग्य समस्यांवर आहेत ‘हे’ रामबाण उपाय

दररोज ४ काजू, ८ मनुका सेवन करा, झटपट बरे होतील ‘हे’ आजार

रात्री उशिरापर्यंत जागणाऱ्या पुरुषांना येऊ शकते ‘नपुंसकत्व’

‘पांढरे डाग’ घालवण्याचे घरगुती उपाय

व्हिटॅमिन ‘डी’च्या कमतरतेमुळे लहान मुलांना होऊ शकतो ‘हाय बीपी’चा धोका

घरी तयार केलेले लोणी चवीसह देते आरोग्य !

पावसाळ्यात काजळाने होते इन्फेक्शन ! अशी घ्या काळजी

असा दूर करा ‘विसरभोळेपणा’, जगा आनंदी आयुष्य

केसगळतीच्या समस्येवर ‘हे’ घरगुती उपाय ठरतील वरदान