काय सांगता ! होय, दादा कोंडकेंच्या गाण्यावर क्रिकेटपटू सूर्यकुमार यादवने केला कडक ‘व्यायाम’; पाहा व्हिडीओ

मुंबई :  पोलीसनामा ऑनलाइन – टीम इंडिया (India Tour Sri Lanka 2021) लवकरच श्रीलंका दौऱ्यावर जाणार आहे. या दौऱ्यात भारतीय संघ एकदिवसीय आणि टी 20 मालिका (T 20 Series) खेळणार आहे. या दोन्ही मालिकांसाठी बीसीसीआयने टीम इंडियाची घोषणा केली असून यात मुंबईकर आणि टीम इंडियाचा युवा खेळाडू सूर्यकुमार यादवलाही (Suryakumar Yadav) संघात स्थान दिले आहे. त्यामुळे फिटनेससाठी जीममध्ये सध्या तो घाम गाळत आहे. सूर्या मजेशीरपणाने मेहनत करत असून जीममध्ये  एका भन्नाट मराठी गाण्यावर वर्कआऊट  (work out in gym on marathi song) करतानाचा व्हिडीओ त्याने इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. वर ढगाला लागली कळ’ या दादा कोंडकेंच्या सुपरहिट गाण्यावर सूर्या वर्कआऊट करत आहे. हा व्हीडिओ चाहत्यांच्या चांगलाच पसंतीस  पडला आहे.

सूर्या मुंबईचाच रहिवाशी असल्याने त्याला मराठी भाषा अवगत आहे. त्याला अनेकदा उत्तम मराठी बोलताना पाहिले गेले आहे.  त्यामुळे त्याला मराठी गाणी देखील आवडत असावी म्हणूनच त्याने या तुफान सुपरहिट गाण्यावर वर्कआऊट करतानाचा व्हिडीओ पोस्ट केला आहे. दरम्यान टीम इंडिया श्रीलंकेच्या दौऱ्यात 3  वनडे अन् 3 ट्वेन्टी-20 सामने होणार आहेत. कोलंबोमधील आर. प्रेमदासा आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर हे सामने होतील.

भारतीय संघ : शिखर धवन (कर्णधार), भुवनेश्वर कुमार (उपकर्णधार), पृथ्वी शॉ, देवदत्त पडीक्कल, ऋतुराज गायकवाड, सूर्यकुमार यादव, मनीष पांडे, हार्दिक पंड्या, नितीष राणा, इशान किशन (यष्टीरक्षक), संजू सॅमसन (यष्टीरक्षक), युजवेंद्र चहल, राहुल चहर, के. गौतम, कृणाल पंड्या, कुलदीप यादव, वरुण चक्रवर्ती, दीपक चाहर, नवदीप सैनी, चेतन साकरिया.

हे देखील वाचा

जम्मू विमानतळावर मोठा स्फोट ! एका पाठोपाठ झाले 2 स्फोट

Sleeplessness | Health Tips : जास्त Mobile वापरल्याने तुम्हाला होऊ शकतो Brain Tumor, स्टडीमध्ये करण्यात आला दावा; जाणून घ्या

Corona Delta Variant | चिंताजनक ! डेल्टा व्हेरिएंटची सर्वाधिक रूग्ण महाराष्ट्रात; ‘या’ 8 राज्यांतच 50 % प्रकरणं

ट्विटर ला देखील फॉलो करा

फेसबुक ला लाईक करा

Web Titel : suryakumar yadav | india cricketer suryakumar yadav dancing workout on marathi song video went viral

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update