सुशांत सिंह रापूजत आत्महत्या प्रकरण : बिहारमधील नीतीश सरकारकडून CBI तपासाची शिफरस, अभिनेत्याच्या वडिलांच्या आग्रहानंतर घेतला निर्णय

पोलिसनामा ऑनलाइन – अभिनेता सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणी बिहार पोलिसांनी मोठं पाऊल टाकत या प्रकरणाचा तपास आता सीबीआयकडून करवून घेण्याचा निर्णय घेतला आहे. सुशांतच्या वडिलांच्या आग्रहामुळं मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी हा निर्णय घेतला आहे.

सुशांतचं कुटुंब सतत सीबीआय चौकशीची मागणी करत होतं. बिहार पोलीस आणि मुंबई पोलीस यांच्यातही आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झडत होत्या. सुशांतच्या वडिलांनी या प्रकरणी नितीश कुमार यांची भेट घेऊन या प्रकरणी सीबीआय चौकशीची मागणी केली होती.

मुंबई पोलीस आणि बिहार पोलीस यांच्यात मतभेद

सुशांत सुसाईड केस प्रकरणी मुंबई पोलीस आणि बिहार पोलीस यांच्यातही मतभेद पाहायला मिळाले आहेत.

नितीश कुमार यांनी सांगितलं की, माझं सुशांतच्या वडिलांसोबत बोलणं झालं आहे. ते म्हणाले या प्रकरणाची सीबीआय चौकशी झाली तर चांगलं होईल. आम्ही आजच या प्रकरणी तपास करण्यासाठी सीबीआयकडे शिफारस करणार आहोत. कारण गेल्या काही दिसवांपासून लोकही सतत सीबीआय चौकशीची मागणी करत आहेत. आमचे आयपीएस अधिकारी मुंबईत गेले तर त्यांना क्वारंटाईन करण्यात आलं.

बॉलिवूड स्टार सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्येला एक महिन्याहून जास्त कालावधी झाला आहे. अजूनही त्याच्या निधनाबद्दल असणाऱ्या निरनिराळ्या चर्चा सुरू आहेत. काही लोक आहेत जे या घटनेला आत्महत्या मानायला तयारच नाहीत. अनेक लोक असे आहेत जे अद्यापही CBI चौकशीची मागणी करत आहेत. चाहत्यांसोबत अनेक सेलिब्रिटींचाही यात समावेश आहे. आता राजकीय लोकही या प्रकरणी सीबीआय चौकशीची मागणी करताना दिसत आहेत. राज्यसभा खासदार सुब्रमण्यम स्वामी यांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदींनाच या प्रकरणी पत्र लिहिलं आहे. अलीकडेच उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे चिरंजीव पार्थ पवार यांनी देखील राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांची भेट घेऊन या प्रकरणाची सीबीआय चौकशी करण्याची मागणी केली होती.