…तर रिया चक्रवर्तीला जमीन खोदून शोधून काढू : बिहार DGP

नवी दिल्ली, वृत्तसंस्था : सुशांत सिंह राजपूत प्रकरणाचा तपास करणार्‍या बिहार पोलिसचे डीजीपी गुप्तेश्वर पांडे यांनी अभिनेत्री रिया चक्रवर्तीला असा इशारा दिला आहे की ज्या दिवशी पोलिसांना त्यांच्या विरोधात पुरावे मिळतील तेव्हा त्यांना जमीन खोदूनही शोधून काढण्यात येईल. एका वृत्तवाहिनीच्या विशेष चर्चेत गुप्तेश्वर पांडे म्हणाले की, रिया चक्रवर्ती एफआयआर मधील आरोपी आहे आणि म्हणूनच पटना पोलिस त्यांचा शोध घेत आहेत. ज्या दिवशी आम्ही पुरावे गोळा करू, त्या दिवशी आम्ही रियाला जमीन खोदूनही शोधून काढू मग ती जगातील कोणत्याही कोपऱ्यात लपलेली असो.’

गुप्तेश्वर पांडे म्हणाले की जर रिया चक्रवर्तीला वाटत असेल की ती निर्दोष आहे तर तिला घाबरून जाण्याची गरज नाही आणि तिने पटना पोलिसांसमोर स्वतःला हजर करावे जेणेकरून सुशांत राजपूत प्रकरणाची चौकशी पुढे आणता येईल. डीजीपी म्हणाले- ‘रिया चक्रवर्तीने समोर आले पाहिजे आणि म्हटले पाहिजे की चौकशी एजन्सीला जे काही विचारायचे आहे ते त्यांनी विचारावे. हा लपाछपीचा खेळ ठीक नाही.’

मुंबई पोलिसांकडून मदत मिळत नाही ?

डीजीपी पांडे पुढे म्हणाले की सुशांत प्रकरणाची चौकशी पुढे नेण्यासाठी पटना पोलीस मुंबई पोलिसांकडून विविध कागदपत्रे आणि सीसीटीव्ही फुटेजची मागणी करत आहेत जी अद्याप त्यांना मिळालेली नाही. तथापि, गुप्तेश्वर पांडे म्हणाले की मुंबई पोलिसांना सीसीटीव्ही फुटेज व कागदपत्रे द्यावी लागतील. ते म्हणाले- ‘आमच्याकडे एफएसएलचा रिपोर्ट नाही. आमच्याकडे चौकशी अहवाल नाही. आमच्याकडे सुशांतचा पोस्टमॉर्टम रिपोर्ट नाही. आमच्याकडे सीसीटीव्ही फुटेजसुद्धा नाही. आमच्याकडे मुंबई पोलिसांनी चौकशी केलेल्या 40-50 लोकांची माहिती नाही. आम्ही रिया चक्रवर्तीला सांगत आहोत की तिने पुढे येऊन या गोष्टी सांगायला हव्यात की ती पळत का आहे ?’

सुशांत सिंह राजपूत प्रकरणात यापूर्वी बॉलिवूडमध्ये होत असलेल्या नेपोटीझम आणि समूहवादाला दोष देण्यात आले होते. मात्र, सुशांतचे वडील केके सिंह यांनी अभिनेत्री आणि सुशांतची मैत्रीण रिया चक्रवर्ती विरुद्ध बिहार पोलिसात एफआयआर नोंदवून संपूर्ण प्रकरण उलथून टाकले. सुशांतच्या कुटुंबीयांनी रियावर मोठे आरोप केले आहेत ज्यात सुशांतला आत्महत्येस प्रवृत्त करण्याचाही समावेश आहे.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
WhatsAPP
You might also like