Sushma Andhare On Chitra Wagh | ‘चित्राबाई पॉर्न फिल्म बघत असतील, त्यांचं पॉर्न व्हिडीओचं ज्ञान अगाध, त्या पारंगत असाव्यात’ : सुषमा अंधारे (Video)

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – Sushma Andhare On Chitra Wagh | कोणत्याही राजकीय जाहिराती बनवत असताना प्रोडक्शन हाऊसकडून रेकॉर्ड चेक केले जाते. या ऍपवर जाणारा प्रोग्राम सेन्सॉर केला जातो, भारत सरकारकडून सेन्सॉर होत असतात. माझं याचं ज्ञान कमी आहे, चित्रा वाघ यांचे पॉर्न व्हिडिओचे ज्ञान अगाध असावे किंवा त्या पारंगत असाव्यात, असे म्हणत शिवसेना ठाकरे गटाच्या (Shivsena UBT) उपनेत्या सुषमा अंधारे यांनी भाजपा (BJP) महिला प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ यांना प्रत्युत्तर दिले.

शिवसेना ठाकरे पक्षाने निवडणुकीसाठी महिला अत्याचारासंदर्भात एक जाहिरात प्रसिद्ध केली आहे. या जाहिरातीमध्ये पॉर्न फिल्ममधील कलाकार घेतल्यावरुन चित्रा वाघ यांनी शिवसेनेवर टीका केली. या टीकेला अंधारे यांनी प्रत्युत्तर दिले. आता या दोन महिला नेत्यांमध्ये चांगलीच जुंपली आहे.(Sushma Andhare On Chitra Wagh)

सुषमा अंधारे यांनी म्हटले की, भाजपच्या आक्रस्थळे बाईने काहीतर बोलण्याचा प्रयत्न केला, आधी तीर मारायचा आणि
नंतर वर्तुळ करायचे, अशी त्यांची सवय आहे. आधी नितेश राणे (Nitesh Rane) यांनी असाच प्रयत्न केला होता.
पॉर्न इंडस्ट्री आपल्याकडे नाही, चित्राबाई पॉर्न फिल्म बघत असतील, आधी आपल्या पक्षाचा सल्ला घ्या,
अर्धवट माहिती घेवून बोलायचा प्रयत्न त्यांनी केला आहे, असे अंधारे यांनी म्हटले.

दरम्यान, महिला शोषण प्रकरणातील रेवण्णा (Prajwal Revanna) वरून भाजपावर टीका करताना प्रियंका चतुर्वेदी
(Priyanka Chaturvedi) म्हणाल्या, जो पॉर्न उमेदवार तुम्ही उभा केला, ज्याने हजारो महिलांचे शोषण केले,
घरात काम करणाऱ्या महिलांनाही ज्यांनी सोडले नाही, पंतप्रधान नरेंद्र मोदींना (PM Narendra Modi) तुम्ही याबाबत
का विचारत नाहीत. मोदींनी प्रज्वल रेवण्णाच्या बाबतीत का विधान केले नाही.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune Police News | पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांच्या आदेशानुसार शहरातील प्रत्येक पोलीस स्टेशन, पोलीस चौकीत अट्टल गुन्हेगारांची परेड (Videos)

Shivajirao Adhalrao Patil On Amol Kolhe | अमोल कोल्हेंनी केलेल्या ‘त्या’ आरोपाने आढळराव संतापले, म्हणाले ”पुरावे द्या, मी निवडणुकीतून माघार घेतो, अथवा तुम्ही बाहेर पडा”

Shaina NC In Pune | येत्या काळातही महाराष्ट्रात पहिली महिला मुख्यमंत्री व्हावी यासाठी आम्ही भूमिका मांडू ! पंतप्रधान नरेंद्र मोदी महिलांच्या प्रश्‍नांवर संवेदनशील – शायना एन.सी.

Ajit Pawar On Sharad Pawar | ह्यांनी केलं की स्ट्रॅटेजी मी केली की गद्दारी? फोडाफोडीवरून अजित पवारांचा सवाल

Cheating Fraud Case | पुणे : म्हाडा स्कीममध्ये फ्लॅट देण्याच्या बहाण्याने 28 लाखांची फसवणूक, दाम्पत्यावर FIR

Murlidhar Mohol | पुण्याचे महायुतीचे उमेदवार मुरलीधर मोहोळ यांच्या प्रचारार्थ तरुणांची बाईक रॅली; महाविद्यालयीन काळातला जल्लोष पुन्हा अनुभवल्याची मोहोळ यांची प्रतिक्रिया