Sushma Andhare | ‘….तर आप्पासाहेब जाधव परत गेले असते का’, जाधव यांच्या दाव्यावर सुषमा अंधारेंची प्रतिक्रिया

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – बीडमध्ये महाप्रबोधन यात्रेच्या (Maha Prabodhan Yatra) सभेआधी ठाकरे गटाच्या (Thackeray Group) शिवसैनिकांमध्ये राडा झाला. ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे (Sushma Andhare) यांच्यासमोर उपजिल्हा प्रमुख गणेश वरेकर (Ganesh Varekar) आणि जिल्हाप्रमुख आप्पासाहेब जाधव (Appasaheb Jadhav) यांच्या शाब्दिक बाचाबाची झाली. यावेळी सुषमा अंधारे यांना दोन चापटा मारल्याचा दावा जिल्हाध्यक्ष आप्पासाहेब जाधव यांनी एक व्हिडिओ शेअर करत केला आहे. या घटनाक्रमांवर आता स्वत: सुषमा अंधारे (Sushma Andhare) यांनी प्रतिक्रिया दिली आहे. त्या एका वृत्तवाहिनीशी बोलत होत्या.

सुषमा अंधारे म्हणाल्या, सुषमा अंधारे (Sushma Andhare) यांच्यावर हात उचलला असं म्हटल्यावर गोंधळ होऊ शकतो, म्हणून आप्पासाहेब जाधवांनी तसा दावा केला असावा. एखादा माणूस समोर येऊन स्वत:च सांगतो की मी हात उचलला. याचा अर्थ निश्चितपणे त्याच्या मनात असं काही करण्याचा विचार असू शकतो.

यावेळी अंधारे यांना तुम्हाला मारहाण झाली का असा प्रश्न विचारला असता त्यांनी स्पष्टपणे सांगितले की, नाही, मला मारहाण झाली असती तर आप्पासाहेब जाधव परत गेले असते का. हे प्रकरण आतापर्य़ंत थांबलं असतं का. हा दावा करुन त्यांना गोंधळ तयार करायचा आहे. यातून आमचं सभेवरील लक्ष विचलित व्हावं असं त्यांना वाटतं. काल तो माणूस ज्या आवेशात येऊन बोलत होता त्यावरुन निश्चितपणे शिंदे गटाकडून (Shinde Group) किंवा शिवसेना (Shivsena) पुन्हा उभी राहू नये असं वाटतं त्यांच्याकडून माझ्या जीवाला धोका असल्याचं अंधारे यांनी सांगितलं.

आप्पासाहेब जाधव यांनी नेमका काय दावा केला?

आप्पासाहेब जाधव म्हणाले, सुषमाताई अंधारे सध्या जिल्ह्यामध्ये खूप दादागिरी करत आहेत.
आमच्या पदाधिकाऱ्यांकडून त्या पैसे मागत आहेत. आपल्या कर्यालयात एसी, फर्निचर आणि सोफा बसवण्यासाठी
त्या पदाधिकाऱ्यांकडून पैसे घेत आहेत. त्या माझंही पद विकत आहेत. मी पक्ष वाढवण्यासाठी रात्रंदिवस मेहनत
करत आहे. रक्ताचं पाणी करत आहे. माझ्या लेकरा-बाळाच्या मुखातील पैसे खर्च करुन मी पक्ष वाढवत आहे.
याकडे सुषमा अंधारेंचं लक्ष नाही. त्यामुळे सुषमा अंधारेंचा आणि माझा वाद झाला.
या वादात मी सुषमा अंधारेंना दोन चापट्या लगावल्या.

Advt.

Web Title : Sushma Andhare | sushma andhare on claim of beating in beed by party district president

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

NCP MP Supriya Sule | देवेंद्र फडणवीसांच्या ‘त्या’ टीकेला सुप्रिया सुळेंचे प्रत्युत्तर, म्हणाल्या-‘ फडणवीस यांनी शरद पवार यांना…’

Solapur Crime News | सीआयडीचे पथक अटकेसाठी आल्याचे समजल्यानंतर वरिष्ठ पोलिस निरीक्षक (Sr. PI), सहाय्यक निरीक्षकासह 7 पोलिस ‘फरार’

Maharashtra Politics News | ‘सुषमा अंधारेंचे काहीच चुकले नाही, पण बीडच्या जिल्हाध्यक्षांचे आरोप महत्त्वाचे’, भाजप आमदाराचे ठाकरेंवर गंभीर आरोप (व्हिडिओ)