पावडर आणि ‘मोदी-शहा-डोवाल’ यांच्या फोटोला फुली मारलेलं संशयित पत्र खा. साध्वी प्रज्ञा यांना मिळालं, प्रचंड खळबळ

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – भाजपाच्या भोपाळ येथील खासदार साध्वी प्रज्ञा सिंह ठाकुर यांना एक संशयास्पद पत्र मिळाले आहे. हे पत्र उर्दूमध्ये लिहिले आहे. पत्रासोबत पावडरही मिळाली आहे. फॉरेन्सिक टीमने साध्वी प्रज्ञा यांच्या घरी जाऊन या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे.

साध्वी प्रज्ञा यांच्या घरी आले पत्र
पावडरसह उर्दूमध्ये लिहिलेले जे पत्र आले आहे, त्यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा, राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोभाल आणि प्रज्ञा ठाकुर यांच्या फोटोवर फुली मारण्यात आली आहे. साध्वीच्या स्टाफने हे संशयास्पद पत्र मिळताच पोलिसांना याची माहिती दिली. यानंतर प्रज्ञा ठाकुर यांच्या घरी पोलीस अधिकारी पोहोचले. यानंतर पोलिसांनी हे संशयस्पद पत्र ताब्यात घेतले तसेच एफएसएल टीमला पाचारण करण्यात आले, या टीमने पावडर आणि उर्दूमध्ये लिहिलेले पत्र जप्त करून तपासासाठी पाठवले आहे.

संशयास्पद पत्र मिळाल्यानंतर खासदार साध्वी प्रज्ञा सिंह ठाकुर यांनी प्रतिक्रिया देताना म्हटले की, हे काम एखाद्या दहशतवाद्याचे असू शकते, परंतु, मी अशा घटनांमुळे घाबरणारी नाही. पत्र उर्दूमध्ये लिहिले असून त्यासोबत अन्य पत्रंही जोडलेली होती. मला यापूर्वीही अशा प्रकारची पत्रं मिळाली आहेत आणि पोलिसांना याबाबत सांगण्यात आले होते. परंतु, त्यांनी कोणतीही कारवाई केली नाही. हे देशाच्या शत्रूंचे मोठे कारस्थान आहे. सीएसपी भूपेंद्र सिंह यांनी सांगितले की, याप्रकरणी कलम 326 आणि 507 अंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

फेसबुक पेज लाईक करा –