‘स्वामी चिन्मयानंद आमच्या पक्षाचे सदस्य नाहीत’ : भाजप

लखनऊ : वृत्तसंस्था – स्वामी चिन्मयानंद हे आमच्या पक्षाचे सदस्य नाहीत असे म्हणत चिन्मयानंद प्रकरणी भारतीय जनता पार्टीने हात वर केले आहेत. भाजपचे प्रवक्ते हरिश्चंद्र श्रीवास्तव यांनी याबाबत भाष्य केलं आहे. लॉ स्टुडंटवर बलात्कार केल्याच्या आरोपाखाली स्वामी चिन्मयानंद अटकेत आहेत.

हरिश्चंद्र श्रीवास्तव पीटीआयशी बोलताना म्हणाले, “स्वामी चिन्मयानंद भाजपचे सदस्य नाहीत. आमचे सर्व रेकॉर्ड्स आता डिजिटल स्वरूपात उपलब्ध आहेत. त्यामुळे आम्ही दाव्यासह सांगतो की, ते आमच्या पक्षाचे सदस्य नाहीत.” असे त्यांनी स्पष्ट केले. चिन्मयानंद यांनी अटक केली असून सध्या ते न्यायालयीन कोठडीत आहेत. त्यांना अटक झाल्यानंतर कोणत्याही भाजप सदस्यांनी आतापर्यंत त्यांना पाठिंबा दिला नाही.

स्वामी चिन्मयानंद यांची हकालपट्टी करण्यासाठी आखाडा परिषदेची 10 ऑक्टोबर रोजी हरिद्वारला बैठक होणार आहे. अखिल भारतीय आखाडा परिषदेचे अध्यक्ष नरेंद्र गिरी यांनी पीटीआयशी बोलताना याबाबत भाष्य केलं आहे. नरेंद्र गिरी म्हणाले, “स्वामी चिन्मयानंद यांच्यावर बलात्काराचा खटला सुरू आहे. जोपर्यंत ते निर्दोष सिद्ध होत नाही तोपर्यंत त्यांना आखाडा परिषदेच्या पदावरून निलंबित करण्यात येईल.” असे त्यांनी स्पष्ट केले.

1999 साली चिन्मयानंद भाजपच्या तिकीटावर उत्तर प्रदेशातील जौनपूरमधून निवडून आले होते. अटल बिहारी वाजपेयी यांच्या मंत्रिमंडळात त्यांची राज्यमंत्री म्हणून निवड झाली होती. 1991 साली बदांयू आणि 1998 साली ते मच्छलीशारमधून विजयी झाले होते.

Visit : policenama.com