स्वरा भास्कर आणि ‘ही’ अभिनेत्री दिसणार ‘लेस्बियन’ कपलच्या भूमिकेत

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – आजच्या काळात समलैगिंकता ही गोष्ट नवीन नाही. अनेक देशांनी याला स्विकारले आहे. भारतासारख्या देशात मात्र, या गोष्टींचा स्विकार करण्यास लोक तयार नाही. याच विषयावर भाष्य करणारा वेगळ्या घाटणीचा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. ‘एक लडकी को देखा तो ऐसा लगा’ नंतर फराझ आरिफ अन्सारी यांनी डायरेक्ट केलेला चित्रपट ‘शिर खुर्मा’ हा नवीन चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. बॉलिवूडमध्ये विविधांगी भूमिका साकारणाऱ्या या दोन अभिनेत्री स्वरा भास्कर आणि दिव्या दत्ता चित्रपटात मुख्य भूमिकेत असणार आहे. त्याबरोबर जेष्ठ अभिनेत्री सुरेखा सिक्री चित्रपटात महत्वाची व्यक्तीरेखा साकारणार आहे.

फराझ आरिफ अन्सारी म्हणाले की, ‘या चित्रपटाची कथा अशी आहे की, अभिनेत्री स्वरा भास्कर आणि दिव्या दत्ता या दोघींचा एलजीबीटीक्यू समुदायाशी खूप जवळून संबंध आहे. . एलजीबीटीक्यू समुदायातील प्रेम कथेवर बेतलेला हा भारतातील पहिलाच चित्रपट असून या चित्रपटासाठी दोघींशी चर्चा करणे मला खूपच सोपे गेले. ‘सिसक’ चित्रपटाच्या अद्भूत यशानंतर या चित्रपटाची कथेचा विचार करण्यास मला खूप वेळ लागला. कारण भारतात असे चित्रपट करणे महत्व एक आव्हान आहे. कारण चित्रपटात जेव्हा पुरुष मुख्य भूमिकेत नसेल तर हा चित्रपट करणे एक चॅलेंज आहे.’ स्वरा भास्करने या नव्या चित्रपटाची माहिती ट्विटरवर दिली.

या चित्रपटात एका महिलेचा प्रवास दाखविण्यात येणार आहे जी आपली ओळख निर्माण करण्यासाठी खूप कष्ट करते. चित्रपटाची कथेच्या जेव्हा विचार करण्यात आला तेव्हा दिग्दर्शकाला पहिले दिव्याचा विचार आला. दिव्या ही भूमिका कशी साकारेल ? याची त्यांनी आधीच कल्पना केली होती.

आरोग्यविषयक वृत्त

अबब ! ‘नेलपेंट’ लावल्याने होऊ शकते ‘हे’ नुकसान

‘या’ तेलांचा वापर केल्यास होतील आरोग्याचे अनेक फायदे

झोपण्याच्या पद्धतीवरून समजू शकते तुमच्या आजारांचे रहस्य

बहुजननामा

अर्थसंकल्प सादर केल्यानंतर दुसऱ्याच दिवशी पेट्रोल-डिझेलच्या दरात वाढ

‘स्वाभिमानी’ ने इशारा देताच तात्काळ कर्ज वाटप सुरू

लोकांना मारहाण करण्यासाठी ‘जय श्री राम’च्या नाऱ्याचा वापर : अमर्त्य सेन

पोलीसनामा

रणवीर सिंहने वाढदिवसानिमित्त फॅन्सला दिली खास भेट, कपिल देवच्या लूकमधील फोटो पाहून फॅन्स थक्क

World Kiss Day : ‘या’ 5 चित्रपटांच्या पोस्टरवर किसिंन सीन, ‘या’ सिनेम्यात तब्बल 23 वेळा झाला ‘लिप लॉक’

प्रियंकासह बॉलिवूडमधील ‘या’ ३ अभिनेत्री कोट्याधीश ; जगतात ‘राजेशाही’ आयुष्य !