स्वाईन फ्ल्यूचे एकाच दिवशी दोन बळी; मृतांचा आकडा १३

पिंपरी चिंचवड : पोलीसनामा ऑनलाईन

पिंपरी चिंचवडमध्ये स्वाईन फ्लूचे एकाच दिवशी दोन बळी गेल्याच समोर आलं आहे. त्यामुळे स्वाईन फ्ल्यूच्या बळीचा आकडा १३ वर पोहचला आहे. ६० वर्षीय पुरुष आणि ७२ वर्षीय वृद्ध महिलेचा यात समावेश आहे. दोघांवर पिंपरी-चिंचवड शहरातील खाजगी रुग्णालयात उपचार सुरू होते. परंतु गेल्या तीन दिवसात चार जणांचा मृत्यू स्वाईन फ्ल्यूमुळे झाल्याने शहरात भीतीचे वातावरण आहे.

जानेवारी पासून शहरात ७९ रुग्ण आढळले,पैकी १३ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.तर २५ रुग्णांवर सध्या उपचार सुरू,त्यातील पाच जणांची प्रकृती चिंताजनक.ऑगस्ट महिन्यात सर्वाधिक म्हणजे १० जणांचा मृत्यू झाला आहे. पिंपरी-चिंचवड परिसरातील माण येथील ७२ वर्षीय वृद्ध महिला आणि मलकापूर बुलढाणा येथील ६० वर्षीय पुरुषावर शहरातील विविध रुग्णालयात उपचार सुरू होते.वृद्ध महिलेवर २ सप्टेंबर तर ६० वर्षीय पुरुषावर ३१ ऑगस्ट पासून उपचार सुरू होते,दोघांची प्रकृती चिंताजनक झाल्याने त्यांच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू केले.परंतु त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे.

पुणे : फक्त चार मिनटे वाचवण्यासाठी आरोपी बनणार का?

सद्य स्थितीला शहरात ऐकून २५ जण बाधित रुग्ण आढळले असून त्यांच्यावर वेगवेगळ्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत.तर ५ जणांवर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत.गेल्या काही दिवसांपासून शहरातील नागरिकांमध्ये स्वाईन फ्ल्यू विषयी धास्ती वाढली आहे.मृतांचा आकडा वाढल्याने शहरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.

जाहिरात