कोथरूडमध्ये तलवारी-कोयत्यांचा नंगा नाच

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन

कोथरूड भागात दहा ते पंधरा जणांच्या टोळक्याने मध्यरात्री तलवारींचा नंगा नाच करत दोघांवर वार केले. तर परिसरात तुफान राडा घालत दहशत माजवल्याची घटना घडली. त्यामुळे परीसरात भीतीचे आणि दहशतीचे वातावरण पसरले होते.

किरण दुढे (27, रा. किष्किंदानगर, कोथरूड ) असे गंभीर जखमी झालेल्याचे नाव आहे. याप्रकरणी धीरज कुडले व त्याच्या 10 ते 15 साथीदारांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
[amazon_link asins=’B071HWTHPH,B0784D7NFX’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’be5267af-b63a-11e8-9679-4bfe59935c0b’]

किरण आणि त्याचा मित्र योगेश साठे व संतोष रात्री सुतारदरा येथे उभारले होते. त्यावेळी आरोपी हे हातात तलवार, कोयते आणि बांबू घेऊन मोठं-मोठ्याने आरडा-ओरडा करत त्याठिकाणावरून जात होते. त्यावेळी बोलत उभारलेल्या किरण आणि संतोष यांच्यावर तलवारीने सपासप वार केले. तसेच तुफान राडा घालत दुकानावर दगड फेक करून दहशत माजवली. त्यानंतर हातातील तलवारी उंचावून गोधळ घालण्यात आला. त्यामुळे नागरिकांची आणि दुकान व्यावसायिकांची चांगलीच धावपळ उडाली.

ऐन गणेशोत्सवात कोथरूड भागात झालेल्या याप्रकारामुळे गुन्हेगारीने डोके वर काढले असून, नागरिक भीतीच्या छाये खाली दिसत आहेत.
[amazon_link asins=’B0756Z53JN,B0746JXMWV’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’d2afe0a8-b63a-11e8-8475-899c9fffbb5f’]

घटनास्थळी वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी भेट दिली आहे.
या प्रकरणी योगेश साठे यांनी फिर्याद दिली आहे. गुन्ह्याचा पुढील तपास सहायक पोलिस निरीक्षक एम.व्ही. राऊत करीत आहेत.