मुलीसाठी पत्नीवर केला ‘तलवारी’ने वार

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन – माहेरी गेलेल्या पत्नीने मुलीला न दिल्याने पतीने पत्नीवर तलवारीने वार करुन तिला जखमी केले. या प्रकरणी निगडी पोलिसांनी पतीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
आसिफ जब्बार शेख (वय२३, रा. राहुलनगर ओटास्किम, निगडी) असे पतीचे नाव आहे. ही घटना निगडीमधील भिमाईनगर ओटास्किम येथे गुरुवारी सकाळी १० वाजता घडली.

याप्रकरणी शायनाज आसिफ शेख (वय२०, रा. भिमाईनगर ओटास्किम, निगडी) यांनी निगडी पोलिसांकडे फिर्याद दिली आहे. याबाबत पोलिसांनी सांगितले की, शायनाज आणि आसिफ हे पतीपत्नी असून त्यांना एक मुलगी आहे. दोघांमध्ये वादविवाद होत असल्याने शायनाज ही आसिफचे घर सोडून माहेरी आईच्या घरी आली होती. गुरुवारी सकाळी ती चहा पित असताना आसिफ तेथे आला. त्याने शायनाज हिला माझी मुलगी मला दे तिला घरी घेऊन जाणार आहे असे सांगितले. त्यावर शायनाज हिने माझी मुलगी तुम्हाला देणार नाही, असे म्हणाली. त्यावर आसिफ याने भांडण सुरु केले आणि अचानक त्याच्याजवळील लोखंडी तलवार काढून शायनाज यांच्या हातावर वार करुन जखमी केले.

आरोग्यविषयक वृत्त –

Loading...
You might also like