वजायनल बॅक्टेरियल इन्फेक्शन होण्यापुर्वीच काळजी घ्या, जाणून घ्या लक्षणं आणि उपाय

पोलीसनामा ऑनलाईन, दि. 22 जुलै : इन्फेक्शन अनेक प्रकारचे आहे. मात्र, त्याकडे दुर्लंक्ष करून चालणार नाही. आणि तेच इन्फेक्शन जर प्रायव्हेट पाटर्स्संदर्भात असेल तर… होय, त्यामुळे महिला, मुलींनी वजायनल बॅक्टेरीयल इन्फेक्शन होण्याअगोदर सावध झालं पाहिजे.

महिलांना त्यांच्या प्राव्हेट पार्टस्वर अनेक समस्या उद्भवतात. अनेकदा अशा समस्यांकडे दुर्लक्ष केल्यामुळे पुढे आजार सुद्धा होण्याची शक्यता वर्तविली जाते.

त्या जागी खाज येणे, त्वचा लाल होणे, लहान आकाराच्या पुळ्या येणे अशा समस्या उद्भवतात. कारण, दररोजचे जीवन जगत असताना अनेक महिलांना स्वतःच्या आरोग्याकडे लक्ष देता येत नाही, अशी कारणे काहीशी समोर येतात.

जर तुम्हाला सुद्धा अनेकदा अशा त्रासाला सामोरे जावे लागत असेल तर आजच तुम्ही वजायनल बॅक्टेरीयल इन्फेक्शन बद्दल माहिती जाणून घ्या. जेणेकरून तुम्हाला वेळीच या आजाराबद्दल कळल्यास स्वतःला त्या आजारांपासून दूर ठेवता येईल.

वजायनल बॅक्टेरीयल इन्फेक्शनचा आजार उद्भवल्यास वजायनामध्ये सूज येणे, त्वचा लाल होणे, अशी लक्षणं दिसतात. या इन्फेक्शनला यीस्ट इंफेक्शन असेही म्हण्तात. यामध्ये त्वचेवर एका प्रकारची बुरशी लागते. त्याला कँडिडा अल्बीकन्स असेही म्हणतात.

बॅक्टेरीयल वजायनल इन्फेक्शन हा आजार महिलांमध्ये खूपच सामान्य आहे. 18 ते 44 वर्ष वयोगटातील महिलांना या आजाराचा धोका अधिक असतो. असंतुलित आहार आणि झोप व्यवस्थीत न झाल्यामुळे हा आजार होण्याची शक्यता वर्तविली जाते. लठ्ठपणा आणि मधूमेह असल्यास हा आजार अधिक प्रकाणात होण्याची शक्यता असते.

काय आहेत लक्षणं?
लघवी करताना जळजळ होणे.
वजायनामध्ये खाज येणे.
व्हाईट डिस्चार्ज होणे.
शरीरसंबंधावेळी जळजळ होणे.
वजायनाला सूज येणे.

जर वजायनल बॅक्टेरीयल इन्फेक्शन झाले असेल तर घाबरून जायचं कारण नाही. कारण काही उपाय केल्यास आणि पथ्थ पाळल्यास हे बरे होण्यास मदत होते. मात्र, या संदर्भात योग्य वैद्यकीय सल्ला घेणे आवश्यक आहे, हे देखील विसरता कामा नये. बर्‍याच केसेसमध्ये असे होते की, मुली याबाबत स्पष्ट बोलत नाहीत. तसेच यासंदर्भातील अडचण आई किंवा मोठ्या आईसमान व्यक्तीला सांगत नाहीत. त्यामुळे हा आजार बळाल्यानंतर लक्षात येते. त्यामुळे हा आजार बळविण्याअगोदर डॉक्टरांना भेटावे किंवा याबाबत घरात आई किंवा आईसमान व्यक्तीला सांगितल्यास त्वरीत उपाय करणे सोयीचे ठरेल.

वजायनल बॅक्टेरीयल इन्फेक्शनपासून बचावाचे उपाय :
जर तुम्हाला अशी लक्षणे जाणवत असतील तर त्वरीत डॉक्टरांचा सल्ला घ्या.
नियमीत दह्याचे सेवन करा. त्यातील एसिडोफिलिक हे खूप लाभदायक ठरते.
फिट्ट/घट्ट कपडे घालू नका. कारण घट्ट कपडे घातल्यामुळे शरीरात रक्तप्रवाह व्यवस्थित होत नाही. त्यामुळे आजार होण्याची शक्यता बळावते.

बॅक्टेरीयल वजायनल इन्फेक्शन रोखण्यासाठी जास्तीत जास्त दिवसातून 8 ते 9 ग्लास पाणी प्या. तुम्ही जितकं जास्त पाणी प्याल तितकं मुत्राद्वारे इन्फेक्शन बाहेर पडण्याला मदत होईल. मादक पदार्थांचे सेवन करू नका. तसेच चहा कॉफीचे सेवन कमी करा. कारण, जर तुम्हाला हे इन्फेक्शन झाले असेल आणि तुम्ही अल्कोहोलचे सेवन करत असाल तर आजार बरा होण्यासाठी वेळ लागण्याची शक्यता असते.
व्हिटामिन सी एक एंटीऑक्सिडेंट आहे रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी हा लाभदायक ठरते. जर तुम्ही व्हिटामीन सी असलेल्या पदार्थांचा आहारात समावेश करत असाल तर वजायनल इन्फेक्शन बरे होण्यात मदत होईल.