Symptoms of Cholera | पावसाळ्यातील धोकादायक आजार कॉलरा, काही तासातच शोषले जाते शरीरातील पूर्ण पाणी, अशाप्रकारे करा बचाव

नवी दिल्ली : Symptoms of Cholera | कॉलरा हा आतड्याचा अतिशय गंभीर आजार आहे. काही तासांत उपचार न केल्यास रुग्णाचा तात्काळ मृत्यू होऊ शकतो. कॉलरावर उपचार आहे पण त्यासाठी तातडीने रुग्णालयात जाण्याची गरज असते. म्हणूनच त्याची लक्षणे दिसल्यानंतर ताबडतोब रुग्णालयात जावे. (Symptoms of Cholera)

 

कॉलरा कसा पसरतो

कॉलराचे बॅक्टेरिया घाणेरड्या पाण्यात जसे की, जमीन, रस्त्यावरील पाण्यात, काही समुद्री खाद्यपदार्थ, कच्ची फळे, भाज्या आणि काही धान्यांमध्ये आढळतात. या गोष्टींद्वारे हे बॅक्टेरिया मानवी शरीरात प्रवेश करतात आणि आतड्यात पोहोचून माणसाला संक्रमित करतात. जिथे जास्त घाण आहे, तिथे कॉलराचा प्रादुर्भाव होण्याचा धोका जास्त असतो. (Symptoms of Cholera)

 

अनेकांमध्ये कॉलराचे बॅक्टेरिया आतड्यात गेल्यावरही लगेच निदान होत नाही. या बॅक्टेरियांची लक्षणे दिसण्यासाठी ७ ते १४ दिवस लागतात. पण यादरम्यान, जर तेच बॅक्टेरिया एखाद्या संक्रमित व्यक्तीच्या विष्ठेतून बाहेर पडले आणि एखाद्या मार्गाने दुसर्‍यामध्ये गेले तर त्या व्यक्तीलाही कॉलराची लागण होते.

 

कॉलराची लक्षणे

 

१. डायरिया किंवा अतिसार –

मेयो क्लिनिकच्या मते, संसर्ग झालेल्या रुग्णाच्या आतड्यात वाढ होताच बॅक्टेरिया पसरतात. हे अचानक घडते. यामध्ये बाधित रुग्णाच्या शरीरातून अत्यंत धोकादायक पद्धतीने द्रव बाहेर पडू लागतो. यामध्ये तासाभरात एक लिटर द्रव शरीरातून बाहेर पडते.

 

२. उलट्या आणि मळमळ-

कॉलराच्या सुरुवातीला उलट्या आणि मळमळ होते. पण एक तासानंतर जुलाब सुरू होतात आणि शरीरातून पाणी बाहेर पडू लागते.

 

३. डिहायड्रेशन –

कॉलराचा संसर्ग झाल्यानंतर एक तासाच्या आत डिहायड्रेशन सुरू होते. संसर्ग झालेल्या रुग्णाचे वजन १० टक्क्यांपर्यंत कमी होते.

 

४. अशक्तपणा, चिडचिडेपणा –

शरीरातील जास्त पाणी कमी झाल्यामुळे तीव्र अशक्तपणा येतो. यासोबतच चिडचिडेपणा खूप वाढतो.

 

५. जास्त तहान –

कॉलरामध्ये खूप तहान लागते. तोंड आणि घसा कोरडा पडतो. खूप थकवा येऊ लागतो.
त्वचा आकुंचन पावू लागते. लघवी अजिबात होत नाही. रक्तदाब खूप कमी होतो आणि हृदयाचे ठोके जलद होतात.

 

कसा करायचा बचाव

* शुद्ध पाणी, स्वच्छता, सॅनिटेशन, सामाजिक जाणीव इत्यादीद्वारे कॉलरा नियंत्रित करता येतो.

* थंड बाटलीबंद पेये खूप दिवसांपासून उघडी राहिल्यास सेवन करू नका.

* सुशीसारखे सूप पावसाळ्यात टाळा.

* कापलेली किंवा खूप पिकलेली फळे खाऊ नका.

* कॉलराची लस घ्यावी.

 

Web Title :  Symptoms of Cholera | what-is-the-cholera-symptoms-causes-prevention-and-treatment

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा