T20 Women’s World Cup | दक्षिण आफ्रिकेचा पराभव करत ऑस्ट्रेलियाने 6 व्यांदा जिंकले विश्वविजेतेपद

केपटाऊन : वृत्तसंस्था – T20 Women’s World Cup | नुकत्याच पार पडलेल्या आयसीसी महिला टी-20 विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियाने दक्षिण आफ्रिकेचा 19 धावांनी पराभव करत 6 व्यांदा विश्वविजेतेपद जिंकले आहे. हा सामना केपटाऊनमध्ये खेळवण्यात आला होता. या सामन्यात ऑस्ट्रेलियाची कर्णधार मॅग लॅनिंगने नाणेफेक जिंकून पहिल्यांदा फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. कर्णधाराचा निर्णय सार्थ ठरवत संघाने 20 षटकांत 6 विकेट गमावून 156 धावा केल्या. यामध्ये बेथ मुनीने सर्वाधिक 74 धावा केल्या. (T20 Women’s World Cup)

यानंतर ऑस्ट्रेलियाने दिलेल्या 157 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना दक्षिण आफ्रिकेचा संघ 20 षटकांत फक्त 137 धावाच करू शकला. त्यामुळे ऑस्ट्रेलियाने हा सामना 19 धावांनी जिंकला. विशेष म्हणजे ऑस्ट्रेलियाच्या महिला संघाने या स्पर्धेत एकही सामना गमावला नाही. ऑस्ट्रेलियाची सलामीवीर बेथ मुनी पुन्हा एकदा संघासाठी धावून आली. तिने या सामन्यात 53 चेंडूत 9 चौकार आणि 1 षटकाराच्या मदतीने 74 धावांची खेळी केली. मुनीशिवाय यष्टिरक्षक फलंदाज अ‍ॅलिसा हिली 18, अ‍ॅशले गार्डनर 29 धावा, ग्रास हॅरिस आणि कॅप्टन मॅग लॅनिंग यांनी प्रत्येकी 10-10 धावांचे योगदान दिले.

दक्षिण आफ्रिकेचे गोलंदाज अपयशी
या सामन्यात दक्षिण आफ्रिकेचा संघ गोलंदाजी करण्यासाठी उतरला तेव्हा त्यांना सुरुवातीला यश मिळू शकले नाही. बेथ मुनी आणि गार्डनर यांनी संघाचा डाव सावरत संघाला 156 पर्यंत नेले. या सामन्यात दक्षिण आफ्रिकेकडून शबनम इस्माईल आणि कॅपने प्रत्येकी 2 विकेट घेतल्या तर नॉनकुलुलेको म्लाबा आणि कोल ट्रायन यांनी प्रत्येकी 1 विकेट घेतली. (T20 Women’s World Cup)

दक्षिण आफ्रिकेच्या फलंदाजांना कमाल करता आलेली नाही
संपूर्ण स्पर्धेत आपल्या दमदार फलंदाजीने चर्चेत राहिलेल्या ताजमिन ब्रिट्सला अंतिम सामन्यात विशेष कामगिरी
करता आलेली नाही. फायनलमध्ये तिला फक्त 10 धावा करता आल्या.
या सामन्यात लॉरा वोल्वार्डने अर्धशतकी खेळी केली पण तिला संघाला विजय मिळवून देता आला नाही.
याशिवाय ट्रायनने 25, मारिजाने कॅपने 11 आणि नादिन डी क्लर्कने 8 धावा केल्या.

Web Title :-T20 Women’s World Cup | t20 womens world cup australia beat south africa by 19 runs win 6th title in womans t20 world cup final

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Akshay Kumar | अक्षय कुमारने पान मसाल्याचा जाहिरातीत काम करण्याबाबत केले मोठे वक्तव्य; म्हणाला – ‘ती माझी सर्वात मोठी चूक….’

Bhandara Crime News | भंडाऱ्यामध्ये रोड रोमिओने काढली तरुणीची छेड; लोकांकडून बेदम मारहाण

Beed Crime News | सततची नापिकी, सावकाराचे डोक्यावर कर्ज या आर्थिक विवंचनेतून बीडच्या शेतकऱ्याने उचलले ‘हे’ टोकाचे पाऊल