T20 World Cup | ऑस्ट्रेलिया वर्ल्ड कपमधून बाहेर, ‘या’ दोनपैकी एका टीमशी होणार भारताचा सामना?

सिडनी : वृत्तसंस्था – टी – 20 वर्ल्ड कप (T20 World Cup) सेमी फायनलमध्ये खेळणाऱ्या चार पैकी दोन टीम फायनल झाल्या आहेत. या दोन्ही टीम सुपर 12 फेरीच्या ग्रुप 1 मधील आहे. आज सिडनी क्रिकेट ग्राऊंडवर (Sydney Cricket Ground) इंग्लंड (England) आणि श्रीलंका (Sri Lanka) संघात निर्णायक सामना झाला. या सामन्यात इंग्लंडनं श्रीलंकेला हरवून सेमी फायनलमध्ये प्रवेश केला आहे. याअगोदर न्यूझीलंडने (New Zealand) सेमी फायनलमध्ये पोहोचणारी पहिली टीम ठरली होती. त्यामुळे न्यूझीलंड आणि इंग्लंड आता ग्रुप 2 मधील दोन टीमशी सेमी फायनलमध्ये भिडणार आहेत. इंग्लंड सलग तिसऱ्यांदा सेमी फायनलमध्ये पोहोचली आहे. (T20 World Cup)

इंग्लंडकडून श्रीलंकेचा धुव्वा
सिडनीत झालेल्या आजच्या अखेरच्या सामन्यात श्रीलंकेनं अवघ्या 141 धावाच स्कोअर बोर्डवर लावल्या. पथुन निसंका (67) (Pathun Nisanka) चा अपवाद वगळता कोणालाही मोठी धावसंख्या उभारता आली नाही. त्यामुळे 142 धावांचं सोपं आव्हान इंग्लंडनं 4 विकेटच्या मोबदल्यात पार केले. या विजयासह गेल्या तीन टी20 वर्ल्ड कपमध्ये सलग तिसऱ्यांदा इंग्लंडनं सेमी फायनल गाठण्याची कमाल केली आहे.

 

टीम इंडियाचा सामना कुणाशी?
ग्रुप 2 मधून कोणत्या दोन टीम सेमी फायनलमध्ये येणार हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. ग्रुप 2 मध्ये सध्या टीम इंडिया 6 पॉईंटसह अव्वल स्थानावर आहे. तर दुसऱ्या क्रमांकावर दक्षिण आफ्रिका (South Africa) आहे. भारताचा सुपर 12 फेरीतील शेवटचा सामना झिम्बाब्वेबरोबर (Zimbabwe) होणार आहे. तर दक्षिण आफ्रिका नेदरलँडविरुद्ध (Netherlands) खेळणार आहे. जर टीम इंडिया पॉईंट टेबलमध्ये पहिल्या क्रमांकावर राहिली तर तिचा सामना इंग्लंडबरोबर होईल.

 

Web Title :- T20 World Cup | australia out of the tournament who will play with india in semi finals

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

T20 World Cup | “…तर भारत उपांत्यफेरीत खेळण्याच्या लायक नाही; इरफान पठाणने व्यक्त केले रोखठोक मत

Chandrakant Khaire | काँग्रेस आमदारांबाबत केलेल्या विधानाबाबत चंद्रकांत खैरेंची दिलगिरी, म्हणाले…

Uddhav Thackeray | ‘राज्यात मध्यावधी निवडणूक लागणार’, उद्धव ठाकरेंचे कार्यकर्त्यांना कामाला लागण्याचे आदेश