तापसी पन्नू आणि ‘सांड की आँख’ चित्रपटाच्या टीमने घेतली उपराष्ट्रपतींची भेट ! नायडू यांच्याकडून ‘कौतुकाची थाप’

पोलीसनामा ऑनलाईन – प्रसिद्ध अभिनेत्री तप्पसी पन्नू आणि ‘सांड की आँख’ या चित्रपटाची स्टारकास्ट टीम काल (शनिवारी) उपराष्ट्रपती एम. वेंकैया नायडू यांना भेटली. या भेटीमध्ये कलाकारांनी आपल्या चित्रपटाबद्दल नायडू यांना माहिती दिली आणि चित्रपट दाखवला . त्यांच्या निवासस्थानी हा चित्रपट पाहणार्‍या उपराष्ट्रपतींनीही आपल्या ट्विटर हँडलवरून कलाकारांच्या परिश्रम व प्रयत्नांचे कौतुक केले आणि शुभेच्छा दिल्या. त्यानंतर तप्पसी पन्नू यांनी उपराष्ट्रपतींच्या प्रोत्साहनपर शब्दांचे आभार मानले.

काय म्हटले उपराष्ट्रपतींनी :
चित्रपट पाहून झाल्यानंतर याबाबत भारतीय उपराष्ट्रपतींच्या अधिकृत खात्यावर यावेळची छायाचित्रे पोस्ट करून त्याबरोबर लिहिले आहे. “आज उपराष्ट्रपतींच्या निवासस्थानी ‘सांड की आँख’ हा हिंदी चित्रपट पाहिला. यावेळी चित्रपटाचे कलाकार तापसी पन्नू, भूमी पेडणेकर आणि दिग्दर्शक तुषार हिरानंदानी यांची उपस्थिती आनंददायक होती. चित्रपटाचे कथानक “महिला शार्पशूटर्स चंद्रो तोमर आणि प्रकाश तोमर यांचे जीवन” यावर आधारित आहे.”
दुसर्‍या पोस्टमध्ये त्यांनी कलाकारांना शुभेच्छा दिल्या आणि लिहिले की, “चित्रपटाशी निगडित अभिनेते आणि तंत्रज्ञांना माझ्या शुभेच्छा. महिलांच्या सबलीकरणाच्या मार्गात येणाऱ्या सामाजिक आव्हानांचे वास्तव चित्रण म्हणजे ‘सांड की आँख’ हा चित्रपट आहे.

उपराष्ट्रपतींकडून अशा प्रकारचे कौतुकाचे शब्द ऐकून कलाकारांना फारच विस्मय आणि आनंद झाला, त्यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करणारे पहिले तापसी आणि भूमी पेडणेकर होते.

नुकतीच बुसान आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात तिच्या ‘डॉली किट्टी और वो चमकते सीतारे’ या चित्रपटाच्या प्रीमियरमध्ये हजेरी लावलेल्या भूमीने उपराष्ट्रपतींच्या कौतुकाबद्दल आनंद व्यक्त केला. “माननीय उपाध्यक्ष महोदय, आमचा प्रिय चित्रपट #SaandKiAankh पाहण्याबद्दल आणि आमचे होस्टिंग केल्याबद्दल धन्यवाद. आमच्या चित्रपटाला प्रेम दिल्याबद्दल धन्यवाद. आपल्या कुटुंबियांसमवेत ही खरोखरची संस्मरणीय वेळ होती. जय हिंद,” असे तिने ट्विट केले.

तुषार हिरानंदानी दिग्दर्शित हा चित्रपट दोन आघाडीच्या महिलांच्या आयुष्यावर आधारित आहे. एप्रिलमध्ये या चित्रपटाचे शूटिंग कलाकारांनी पूर्ण केले.अनुराग कश्यप आणि निधी परमार निर्मित प्रकाश झा, विनीत कुमार आणि शाद रंधावा यांच्या मुख्य भूमिका असलेल्या हा चित्रपट या दिवाळीत चित्रपटगृहात दाखल होणार आहे.

visit : Policenama.com