‘जेठालाल’नं सांगितली संघर्ष कथा, म्हणाला – ‘एका भागासाठी मिळायचे 50 रुपये’

पोलिसनामा ऑनलाइन – तारक मेहता का उल्टा चष्मा (Taarak Mehta Ka Ooltah Chashmah) ही मालिका आजही खूप फेमस आहे. गेली 12 वर्षे ही मालिका सातत्यानं सुरू आहे. यातील जेठालाल चंपकलाल गडा (Jethalal Champaklal Gada) हे पात्रही प्रेक्षकांना खूप आवडतं. ही भूमिका साकारणारे अभिनेता दिलीप जोशी (Dilip Joshi) यांनी त्याच्या स्ट्रगलबद्दल सांगितलं आहे. एका मालिकेतून लाखोंची कमाई करणारे दिलीप जोशी हे कधीकाळी 50 रुपयांसाठी संघर्ष करत होते. त्यांनी अनेक थक्क करणाऱ्या गोष्टी सांगितल्या आहेत.

एका मुलाखतीत बोलताना दिलीप जोशी म्हणाले की, त्यांनी अभिनयाची सुरुवात गुजरात रंगभूमीवरून केली होती. खरं तर ते एक बॅकस्टेज आर्टीस्ट महणून काम करत होते. ज्या दिवशी नाटक असेल त्या दिवशी स्टेजवरील साहित्य नीट ठेवणं, कलाकारांच्या चहा-पाण्याची सोय करणं अशी कामं ते करायचे. बॅकस्टेज काम करतानाच त्यांना अभिनयात काम करण्याची संधी मिळाली. त्यावेळी नाटकाच्या एका भागासाठी त्यांना 50 रुपये मिळायचे. तेही ठराविक भाग झाल्यानंतर मिळत होते.

अभिनयाची आवड आणि महत्त्वाकांक्षा यांच्या जोरावर दिलीप जोशी यांनी नाटक, मालिका आणि पुढं सिनेमा अशी बाजी मारली. करिअरच्या सुरुवातीच्या काळात त्यांना अनेक समस्यांचा सामना करावा लागला आहे. जीवनात कधीही हान मानू नये आणि संधीचं सोनं करण्यासाठी तयार रहावं असा सल्लाही त्यांनी चाहत्यांना दिला आहे.