मुख्यमंत्र्यांच्या महिला विशेष अधिकाऱ्याच्या ‘पर्स’वर चोट्यांचा डल्ला

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन

मुंबई आणि उपनगर भागामध्ये गाड्यांमधून मोबाईल, बॅग पळवणाऱ्या टकटक गँगने सध्या धुमाकुळ घातला आहे. या गँगचे आत्तापर्य़ंत सर्वसामान्य नागरिक टारगेट होते. मात्र, आता या टोळीने मुख्यमंत्र्यांच्या महिला विशेष अधिकाऱ्याची पर्स चोरुन पोलिसांना एकप्रकारे आव्हानच केले आहे. विशेष म्हणजे ज्या कारमधून या महिला अधिकाऱ्याची पर्स चोरीला गेली ती कार पोलीस कार होती.

[amazon_link asins=’B0784D7NFX’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’ea4dd298-bb26-11e8-8148-c36ec78bef53′]

एका वृत्तपत्राने दिलेल्या वृत्तानुसार, मुख्यमंत्री कार्यालयात विशेष अधिकारी असलेल्या निधी कामदार यांची पर्स आणि मोबाईल चोरीला गेला आहे. जहांगीर आर्ट गॅलरीजवळ ५ सप्टेंबर रोजी दुपारी तीनच्या सुमारास ही घटना घडली. निधी कामदार या कुल्याब्यातील एका पंचतारांकित हॉटेलमधून परतत असताना त्या एका दुकानासमोर थांबल्या. निधी या एका पोलीस कॉन्स्टेबल सोबत पोलिसांच्या वाहनाने प्रवास करत होत्या. दुकानामध्ये जाताना त्यांनी त्यांची पर्स आणि मोबाईल हा कारमध्येच ठेवला. पोलिसांच्या गाडीच्या बाजूला अचानक एक व्यक्ती आली आणि रस्त्यावर पैसे पडल्याचं कारमधील पोलिसांना सांगितलं. नेमकं काय झालं ते पाहण्यासाठी पोलिसांनी कारची काच खाली केली. हिच संधी साधत चोरट्यांनी कामदार यांची पर्स आणि मोबाईल लंपास केला आणि ते पसार झाले. चोरीचा हा संपूर्ण प्रकार लक्षात येताच पोलिसांनी चोरांना पकडण्याचा प्रयत्न केला. मात्र टकटक गँगचे सदस्य पळून जाण्यात यशस्वी झाले. पोलीस चालकाने कुलाबा पोलिसांशी संपर्क साधून गुन्ह्याची नोंद केली.

भाजपाची नवी मोहीम: नमो अॅप’ वरुन टी-शर्ट, टोप्या, पेनची विक्री 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ज्या परिसरात चोरीची घटना घडली तेथील सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात येत आहे. तसेच टकटक गँगला पकडण्यासाठी तपास सुरू असल्याचंही त्यांनी सांगितलं. निधी कामदार या नागपूरच्या असून त्या मुख्यमंत्री कार्यालयात सोशल मीडिया प्रमुख आहेत.