गणेश विसर्जन मिरवणुकीला जाताय ‘ही’ घ्या काळजी !

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – राज्यासह देशभरात आज मोठ्या उत्साहात गणेश विसर्जन होत असून त्यानिमित्ताने दिमाखदार मिरवणुका काढून बाप्पाचे विसर्जन केले जाते. या विसर्जन मिरवणुका पाहण्यासाठी लाखोच्या संख्येने नागरिक सहभागी होतात. या गर्दीचा गैरफायदा घेऊन चोरटे चोऱ्या माऱ्या, पाकीटमारी, मोबाईल चोऱ्या मोठ्या प्रमाणात होत असतात. या चोरट्यांचे आपण शिकार होऊ नये, म्हणून प्रत्येकाने काही काळजी घेण्याची आवश्यकता आहे.

1 मिरवणुकीला जाण्यापूर्वी घर व्यवस्थित बंद करुन जा. या काळात घरे बंद असल्याचे विशेषत: उपनगरांमध्ये घरफोडीच्या घटना अधिक होत असतात. तेव्हा घरातील मौल्यवान वस्तू कपाटात कुलूप लावून ठेवा.
2 सोसायटीमध्ये अनोळखी कोणी येत असेल तर त्याची चौकशी करा. तशी सूचना सुरक्षा रक्षकाला द्या.
3 मिरवणुकीला जाताना अंगावर मौल्यवान दागिने घालून जाऊ नका.
4 लहान मुले, गर्भवती महिला, ज्येष्ठ नागरिकांना गर्दीत घेऊन जाऊ नका. एका बाजूला थांबून मंडळांचे देखावे पाहावेत.
5 गर्दीत चुकामुक झाली तर जवळच्या पोलीस मदत केंद्राला भेट द्या. त्यांना सर्व माहिती द्या.
6 गर्दीत पुरुषांच्या पॅटंमधील मागील बाजूला ठेवलेले पाकिट मारण्याचे प्रकार घडतात. त्यावर लक्ष ठेवा. अनेक जण मागील बाजूच्या खिशात मोबाईल ठेवतात. तो चोरट्यांना लांबविणे सहज शक्य होते. अशा गर्दीच्या ठिकाणी शर्टच्या वरच्या खिशात मोबाईल ठेवावा. म्हणजे तो डोळ्यासमोर राहतात.
7 गर्दीच्या काळात मोबाईलच्या कॉडचा वापर करावा. त्यामुळे कोणी चोरीचा प्रयत्न केला तर हिसका बसून तो प्रकार आपल्या पटकन लक्षात येऊ शकतो.
8 स्वाईन फ्ल्युची साथ सध्या सुरु आहे. त्यामुळे थंडी, ताप सर्दी, अ‍ॅलर्जी असलेल्यांनी गर्दीत जाणे टाळावे.
9 काही संशयित वाटल्यास पोलिसांना १०० क्रमांकावर कळवावे.

आरोग्यविषयक वृत्त –

You might also like