TAMA Electric Car | 1947 मध्येच बनवण्यात आली होती टेस्लाच्या तोडीची इलेक्ट्रिक कार, जाणून घ्या 130 वर्षांचा जुना इतिहास

नवी दिल्ली : TAMA Electric Car | एलन मस्क (Elon Musk) यांची टेस्ला (Tesla) कार जगभरात गाजल्यानंतर भारतात लाँचिंगच्या तयारीत आहे. मात्र, तुम्हाला ऐकून आश्चर्य वाटेल की, इलेक्ट्रिक कारचा इतिहास 130 वर्षांपेक्षा जास्त जुना आहे. 1947 मध्ये जपानमध्ये बनवण्यात आलेली तामा (TAMA Electric Car) इलेक्ट्रीक कार टेस्लाच्या कारला टक्कर देणारी होती.

1890 मध्ये बनवली होती पहिली Electric Car

इलेक्ट्रिक कारसाठी सर्वात महत्वाची गोष्ट आहे बॅटरीवर चालणारी इलेक्ट्रिक मोटर. अशा मोटर 19व्या शतकाच्या सुरुवातीलाच अस्तित्वात आल्या होत्या. विलियम मॉरिसन नावाच्या एका संशोधकाने 1890 मध्ये एक इलेक्ट्रिक कार बनवली होती. तिला जगातील पहिल्या इलेक्ट्रिक कारचे श्रेय मिळते.

पोर्श कंपनीने 1898 मध्ये पी1 नावाने आपली पहिली इलेक्ट्रिक कार तयार केली होती. कारण या कारचा आवाज होत नव्हता आणि यातून धूरही निघत नव्हता. तिला वेगाने लोकप्रियता मिळाली. 1900 मध्ये अमेरिकेच्या न्यूयॉर्कच्या रस्त्यांवर 60 पेक्षा जास्त इलेक्ट्रिक कार टॅक्सी सेवामध्ये वापरात होत्या.

आधुनिक इलेक्ट्रिक कारसारखी होती TAMA Electric Car

जपानची कार कंपनी तोक्यो इलेक्ट्रो ऑटोमोबाइल कंपनीने तामा (TAMA Electric Car) नावाने एक इलेक्ट्रिक कार तयार केली होती. या कारमध्ये ताचिकावा एयरक्राफ्टच्या टेक्नॉलॉजीचा वापर केला होता. ही कार पहिल्यांदा 1947 मध्ये बाजारात आणली होती.

हा दुसर्‍या महायुद्धानंतरचा काळ होता. अणू हल्ला आणि पराभवानंतर जपान आर्थिकदृष्ट्या कमजोर झाला होता. देशात तेल, अन्न यांच्या किंमती वाढल्या होत्या. उद्योग-धंद्य बुडाले होते. मात्र, वीजेची स्थिती चांगली होती. यामुळे जपान सरकार वीजेसंबंधी इनोव्हेशनला प्रोत्साहन देत होते. याच प्रयत्नातून तोक्यो इलेक्ट्रिक ऑटो कंपनीने ही कार बनवली होती.

एका चार्जमध्ये ही 200 किलोमीटर

तामा इलेक्ट्रिक कार पहिल्या चाचणीत 96 किलोमीटर धावली आणि 35 किलोमीटर प्रति तासाचा वेग दिला.
काही सुधारणांनंतर ती एका चार्जमध्ये 200 किलोमीटर धावू लागली आणि 50 किलोमीटर प्रति तासाचा वेग देऊ लागली होती.

सध्या लोकप्रिय इलेक्ट्रिक कारपैकी टेस्लाचे बेसिक इलेक्ट्रिक कार मॉडल3 हे 400 किलोमीटरच्या जवळपास रेंज देते.
तिचा टॉप स्पीड 225 किलोमीटर प्रति तास आहे. टाटाची नेक्सन ईव्ही एकदा चार्ज केल्यावर 300 किलोमीटर धावते आणि 120 किलोमीटर प्रति तास वेग देते.

1951 पर्यंत तामा कार जपानमध्ये टॅक्सी सेवेसाठी मोठ्याप्रमाणात वापरली जात होती.
नंतर तोक्यो इलेक्ट्रो ऑटोमोबाइलचे नाव प्रिंस मोटर्स झाले, जी निसानने 1966 मध्ये खरेदी केली होती. 2010 मध्ये पहिली आधुनिक इलेक्ट्रिक कार निसान लीफ तयार करण्यात आली तेव्हा कंपनीने तामाला सुद्धा रिस्टोअर केले.
आज मुळ फीचरसह रिस्टोर तामा इलेक्ट्रिक कारचे हे मॉडल निसानच्या कार्यालयात शोकेसमध्ये आहे.

हे देखील वाचा

Sangli News | दुर्देवी ! पाझर तलावात बुडून सख्ख्या बहिण-भावाचा मृत्यू

Maharashtra Band | पुण्यात ‘सरकारी’ बंदला मध्य वस्तीत ‘उर्त्स्फुत’ प्रतिसाद ! उपनगरांमध्ये सर्व व्यवहार सुरळीत, पीएमपी बसगाड्या, रिक्षा बंद

Aadhaar कार्डच्या फ्रॉडपासून वाचायचे असेल तर लवकर अपडेट करा ‘हा’ नंबर, UIDAI ने सांगितली संपूर्ण प्रक्रिया; जाणून घ्या

 

 

ट्विटर ला देखील फॉलो करा

फेसबुक ला लाईक करा

Web Titel : TAMA Electric Car | do you know tama electric car of japan decades ago had features like tesla cars of elon musk

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update