Tamanna Bhatia | रोमँटिक सीन किंवा इंटिमेट सीन करतानाचा अनुभव तमन्ना भाटियाने केला शेअर; म्हणाली…

पोलीसनामा ऑनलाइन टीम – लोकप्रिय दाक्षिणात्य अभिनेत्री तमन्ना भाटियाने (Tamanna Bhatia) साउथ सोबतच बॉलीवूडमध्ये देखील आपल्या अभिनयाच्या जोरावर अनेकांची मन जिंकली आहेत. तमन्नाचे आज अनेक चाहते आहेत. तिच्या अभिनयासोबतच तिच्या सौंदर्याने देखील ती सर्वांचे लक्ष वेधून घेत असते. नुकताच तमन्नाने (Tamanna Bhatia) एका मुलाखतीत केलेल्या वक्तव्यामुळे सध्या ती चर्चेत आहे.

 

 

तमन्नाने या मुलाखतीमध्ये सहकलाकारांसोबत चित्रीकरण करताना येणारा अनुभव शेअर केला आहे. यामध्ये तिने रोमँटिक सीन आणि इंटिमेट सीन करताना देखील होणाऱ्या अवस्थेबद्दल ही भाष्य केले आहे. यावेळी तमन्ना (Tamanna Bhatia) म्हणाली जेव्हा एखाद्या वेब सिरीज किंवा चित्रपटात इंटिमेट सीन चित्रित केले जाते तेव्हा स्त्री कलाकार त्याचबरोबर पुरुष कलाकार ही अस्वस्थ असतात. प्रत्येक पुरुष कलाकार हे सीन अगदी चोखपणे देतो असे नाही. काही विचित्र पद्धतीने देखील वागत असतात”.

 

 

पुढे बोलताना ती म्हणाली, “प्रत्येक कलाकाराची पद्धत ही वेगळी असते. बहुतेक वेळा पुरुष कलाकारांच्या मनात महिला कलाकारांपेक्षा अनेक प्रश्न उपस्थित होत असतात. यावेळी त्यांच्या मनात आपण जिच्या सोबत रोमँटिक सीन करत आहोत तिच्या मनात आपल्याविषयी काय भावना असतील आणि हा सीन कसा होईल असे एक ना अनेक विचार त्यांच्या डोक्यात सतत येत असतात आणि ते त्यांच्या चेहऱ्यावर दिसत असते.
तर काही कलाकार चित्रीकरणा दरम्यान अडथळा निर्माण करत विचित्र पद्धतीने वागून समोरच्या सह कलाकाराला देखील नर्वस करत असतात.
मात्र असे सीन चित्रित करत असताना स्त्री कलाकारापेक्षा पुरुष कलाकार हे नेहमीच नर्वस आणि तणावात असल्याचे दिसते”.

 

Web Title :- Tamanna Bhatia | tamanna bhatia reveals male actors are more conscious during romantic scenes

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Janhvi Kapoor | अभिनेत्री जान्हवी कपूरच्या ट्रेडिशनल ड्रेस मधील हॉट फोटोजने चाहत्यांचे वेधले लक्ष

Chief Ministers Gun Collection | भारतातील 8 मुख्यमंत्र्यांपैकी सगळ्यात महाग बंदुका CM एकनाथ शिंदे यांच्याकडे

Prarthana Behere | ‘बेशरम रंग’ या गाण्यावर ‘या’ मराठी अभिनेत्रीचा हॉट अंदाज; चाहते घायाळ