Beed Accident | दुर्देवी ! महिला पोलीस कर्मचाऱ्यासह 9 वर्षाच्या मुलाचा अपघातात मृत्यू

बीड : पोलीसनामा ऑनलाइन – Beed Accident | दोन कारची समोरासमोर धडक होऊन झालेल्या भीषण अपघातात महिला पोलीस कर्मचाऱ्यासह (Lady Police) त्यांच्या 9 वर्षाच्या मुलाचा (Year Old Kid) दुर्दैवी मृत्यू झाला. हा अपघात एवढा भीषण होता की गाड्या रस्ता सोडून शेतात एकमेकांवर आदळल्या. हा अपघात बीडच्या (Beed Accident) परळी रोडवर आज (मंगळवार) सकाळी 10.30 च्या सुमारास झाला. कोमल शिंदे (Komal Shinde) आणि यश शिंदे (Yash Shinde) असे अपघातात मृत्यू झालेल्या मायलेकरांची नावे आहे. कोमल शिंदे या दिंद्रुड पोलीस ठाण्यात (Dindrud Police Station) कार्यरत होत्या. (Beed Police)

 

मिळालेल्या माहितीनुसार, दिंद्रूड येथील पोलीस कर्मचारी कोमल शिंदे या आजारी मुलाला उपचारासाठी परळी येथे कारमधून (एमएच 14 जिवाय 9113) घेऊन जात होत्या. कार पोलीस कर्मचारी नवनाथ लटपटे (Navnath Laptate) चालवत होता. दरम्यान परळीच्या दिशेने दुसरी कार (एमएच 47 5326) समोरून येत होती. दोन्ही कारची सिरसाळा जवळ समोरासमोर धडक (Beed Accident) झाली. यात पोलीस कर्मचारी शिंदे आणि त्यांचा मुलगा यश याचा जागीच मृत्यू झाला.

 

तर चालक लटपटे आणि दुसऱ्या कारमधील एकजण गंभीर जखमी झाले आहेत.
दुसऱ्या कारमधील व्यक्ती वैद्यकीय अधिकारी डॉ. इलियास (Medical Officer Dr. Elias) असल्याची माहिती समोर येत आहे.
जखमींना तात्काळ पोलीस आणि नागरिकांनी अंबाजोगाई येथील शासकीय रुग्णालयात (Ambajogai Government Hospital) उपचारासाठी रवाना केले आहे.
या अपघाताची पोलिसांकडून पुढील तपास सुरु आहे.

 

Web Title :- Beed Accident | teerible car accident lady police and 9 year old kid died beed accident news

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Pune Crime | लग्नाचे आमिष दाखवून तरुणीवर लैंगिक अत्याचार; लग्नाविषयी विचारल्यावर व्हिडिओ व्हायरल करण्याची दिली धमकी

 

Pune Rain | पुण्यासह राज्यातील ‘या’ जिल्ह्यात गणरायाच्या स्वागताला पावसाची हजेरी, हवामान खात्याचा इशारा

 

Mohit Kamboj | भाजप नेत्यांबद्दल केलेलं वक्तव्य भोवलं, राष्ट्रवादीच्या महिला प्रदेशाध्यक्ष विद्या चव्हाण यांच्या विरोधात गुन्हा दाखल