‘लॉकडाउन’ मध्ये अन्नासाठी तळमळतायेत मजूर-कामगार, ‘या’ 85 वर्षाच्या आजी फक्त 1 रुपयांत भरतायेत गरिबांचं ‘पोट’

नवी दिल्ली :  वृत्तसंस्था  –   कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी देशभर लॉकडाउन सुरूच आहे. याची सर्वात मोठी समस्या गरीब आणि दैनंदिन मजुरांना भेडसावत आहे. अशा परिस्थितीत जेव्हा लोकांपढे रोजीरोटीचे संकट उभे आहे तेव्हा तमिळनाडूची प्रसिद्ध आजी अजूनही लोकांच्या मदतीला धावून जात आहे.

तमिळनाडूच्या कोयंबटूर शहरातील 85 वर्षांची आजी कमलाथल अजूनही मजुरांना आणि निराधारांना फक्त 1 रुपयांत सांभार आणि मसालेदार चटनी सोबत इडली खाऊ घालत आहे. लॉकडाउन व दुकान बंद झाल्यानंतरही ती भुकेल्यांना केवळ एका रुपयात भोजन देत आहे. ती आजही लोकांना सतत मदत करत आहे.

माध्यमांशी बोलताना त्या म्हणाल्या की कोरोनामुळे परिस्थिती खूपच बिकट झाली आहे, परंतु तरीही मी प्रत्येकासाठी प्रयत्न करीत आहे जेणेकरुन एखाद्याचे पोट फक्त 1 रुपयांत भरावे. दादी म्हणून प्रसिद्ध असलेल्या कमलाथल या कोयंबटूर शहरापासून सुमारे 20 किमी अंतरावर पेरूर जवळील एका खेड्यात राहतात आणि तेथील लोकांना फक्त 1 रुपयांत दररोज सांबार आणि मसालेदार चटणीसह इडली विकतात.