Tanaji Sawant | ‘आदित्य ठाकरे एक साधा आमदार, मी त्यांना महत्व देत नाही’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) हे केवळ एक आमदार (MLA) आहेत. त्यापलीकडे मी त्यांना फार महत्त्व देत नाही, असे विधान शिंदे गटाचे (Shinde Group) बंडखोर आमदार तानाजी सावंत (Tanaji Sawant) यांनी केले आहे. शिवसेना (Shivsena) नेते आदित्य ठाकरे हे आज पुण्यात असून ते कात्रज चौकात सभा घेणार आहेत. हे ठिकाण तानाजी सावंत (Tanaji Sawant) यांच्या कार्यालयापासून काही अंतरावर आहे. याच दरम्यान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांचा देखील कार्यक्रम होणार आहे. पुण्यात आढावा बैठक घेतल्यानंतर शिंदे तानाजी सावंत यांची भेट घेणार आहेत.

 

एकनाथ शिंदे तानाजी सावंत यांची भेट घेणार असल्याच्या पार्श्वभूमीवर आदित्य ठाकरे यांची कात्रज चौकात (Katraj Chowk) सभा ठेवण्यात आली आहे का, असा प्रश्न सावंत (Tanaji Sawant) यांना विचारला. यावर उत्तर देताना तानाजी सावंत म्हणाले, आदित्य ठाकरेंचं शक्तीप्रदर्शन कसलं. त्यांचा तर शक्तीपात झाला आहे. आमची सगळी शक्ती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पाठिशी आहे. एकही शिवसैनिक (Shiv Sainik) त्यांच्या पाठिशी राहिलेला नाही. आदित्य ठाकरे हे कोण आहेत ? तो एक साधा आमदार आहे. यापेक्षा जास्त महत्त्व मी त्यांना देत नाही, असे तानाजी सावंत यांनी आक्रमक होत सांगितले. सावंत यांच्या विधानावरुन शिवसेना आक्रमक होण्याची शक्यता आहे.

तानाजी सावंत यांनी शिवसेनेत बंडखोरी करुन एकनाथ शिंदे गटात सामील झाले.
यानंतर संतप्त झालेल्या पुण्यातील शिवसैनिकांनी सावंत यांच्या कार्यालयाची तोडफोड केली.
मात्र माझे कार्यालय शिवसैनिकांनी नाही तर राष्ट्रवादीच्या (NCP) कार्यकर्त्यांनी फोडले.
राष्ट्रवादीचे कार्यकर्ते भगवे शेले घालून माझ्या कार्यालयात आले होते. त्यांच्यासोबत एक किंवा दोनच शिवसैनिक असतील,
असे सावंत यांनी सांगितले.

 

Web Title : –  Tanaji Sawant | eknath shinde camp mla tanaji sawant slams shivsena leader aaditya thackeray

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा