बेळगावात ‘तान्हाजी’ सिनेमाला ‘कनसे’चा जोरदार ‘विरोध’, सिनेमागृहाबाहेर ‘राडा’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – बेळगावातील ग्लोब सिनेमागृहात तान्हाजी सिनेमा प्रदर्शित झाल्यानंतर या सिनेमाला कर्नाटक नवनिर्माण सेनेने जोरदार विरोध केला आहे. कनसेच्या कार्यकर्त्यांनी थिएटर प्रशासनाला सिनेमाचे पोस्टरही खाली उतरवण्यास भाग पाडलं आहे. यावेळी त्यांनी बराच गोंधळ घातला.

संपूर्ण भारतात आज तान्हाजी सिनेमा रिलीज झाला आहे. बेळगावातील ग्लोब सिनेमागृहातही हा सिनेमा रिलीज झाला. काही दिवसांपूर्वी भीमाशंकर पाटील या कनसेच्या प्रमुखांनी समितीच्या नेत्याबद्दल वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. याचे पडसाद कोल्हापूरासह महाराष्ट्रातील इतर भागात उमटले होते. त्यावेळेस कोल्हापूरातील शिवसैनिकांनी कोल्हापूरमध्ये रिलीज झालेला एक कन्नड चित्रपट बंद पाडला होता. त्याचाच राग मनात धरून आता कनसेच्या काही कार्यकर्त्यांनी ग्लोब सिनेमागृहासमोर राडा घातला आणि तान्हाजी सिनेमाला विरोध दर्शवला आहे. यावेळी कार्यकर्त्यांकडून जोरदार घोषणाबाजीही झाली. तान्हाजी सिनेमाचा निषेध असो अशा घोषणा त्यांनी दिल्या. यावेळी गोंधळ आणि दबाव निर्माण करत त्यांनी तान्हाजीचे पोस्टर उतरवायला लावले.

कार्यकर्त्यांच्या गोंधळानंतर थिएटर प्रशासनाने तान्हाजी सिनेमाचे लावलेले पोस्टर उतरवल्याचे दिसून आले. या घटनेनंतर पोलीसही घटनास्थळी दाखल झाले होते.

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/