अनेक वर्षानंतर स्टेजवर थिरकली तनुश्री दत्ता, व्हायरल झाला अभिनेत्रीचा ‘डान्स’ (व्हिडीओ)

पोलीसनामा ऑनलाइन टीम – बॉलिवूड अ‍ॅक्ट्रेस तनुश्री दत्ता नुकतीच महाशिवरात्रीच्या निमित्तानं भारतात आली होती. राजस्थानमधील प्रतापगडमधील एका इवेंटमध्ये तिनं डान्स परफॉर्मंसही दिला. तनुश्रीनं या डान्स परफॉर्मंसचे काही फोटो आणि व्हिडीओ सोशलवरून शेअर केले आहेत. समोर आलेल्या फोटोत आणि व्हिडीओत तनुश्री भगवान शंकराच्या गाण्यांवर डान्स करताना दिसत आहे.

यावेळी तनुश्री दत्तानं एवढे दिवस स्टेजपासून दूर असण्याचं कारणही सांगितलं. तनुश्रीच्या पायाला मार लागल्यानं फ्रॅक्चर झाला होता. याच कारणामुळं ती स्टेजपासून दूर होती.

तनुश्रीच्या लुकबद्दल बोलायचं झालं तर तिनं ब्लॅक आणि गोल्डन कलरचा ड्रेस घातला आहे. या लुकमध्ये तनुश्री खूपच सुंदर दिसत आहे. तनुश्रीचे हे फोटो आणि व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहेत. तनुश्रीच्या अनेक चाहत्यांना तिला डान्स करताना पाहून आनंद झाला आहे. तिच्या अनेक चाहत्यांनी तिच्या लुकचं आणि तिच्या डान्सचं कौतुक केलं आहे. अनेकांनी तनुश्रीच्या पोस्टवर कमेंट केली आहे.

काही दिवसांपूर्वी तनुश्री दत्तानं अभिनेते नाना पाटेकरांवर गैरवर्तनाचे आरोप केले होते. तेव्हा हे प्रकरण खूपच चर्चेत आलं होतं. यानंतर पुन्हा एकदा तनुश्री आपल्या स्टेज परफॉर्मंसमुळं चर्चेत आली आहे.

https://www.instagram.com/p/B7s2dZnllbE/