भाजप नेत्याचा दावा : चिनी सैन्य भारतात 100 KM घुसले, आर्मीने दिले उत्तर

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – भारत सरकारच्या कलम ३७० संदर्भातील निर्णयानंतर पाकिस्तानची वक्तव्ये पाहता भारतीय सैन्याच्या हालचालींना महत्व आले आहे आणि त्याची चर्चा सातत्याने सुरु आहे. अशातच अरुणाचल प्रदेशमध्ये लाकडी पुलाद्वारे चिनी सैन्य सुमारे १०० किमी घुसले असा सनसनाटी दावा  भाजपचे खासदार तपीर गाओ यांनी केला होता. यासंदर्भात त्यांनी एक व्हिडिओ देखील जारी केला होता. तथापि, जेव्हा भारतीय सैन्याने त्यांच्या दाव्याची चौकशी केली तेव्हा त्यांनी यात तथ्य नसल्याचे आणि खासदारांनी शेअर केलेला व्हिडिओ संशयास्पद असल्याचे म्हटले आहे.

यासह, लष्कराने हे देखील स्पष्ट केले की खासदारांनी आपल्या दाव्यामध्ये ज्या लाकडी पुलाचा उल्लेख केला आहे त्याची नेमकी जागा तिथे नाही, परंतु या दाव्याची चौकशी करण्यासाठी गस्त घालणारी पार्टी पाठविली गेली आहे.

दरम्यान, भाजपचे खासदार तपीर गाओ यांनी यापूर्वी वृत्तसंस्थेला दिलेल्या निवेदनात असे म्हटले होते की मी या भागात गस्त घालणाऱ्या सैन्यदलाला दोष देत नाही. पण इथे रस्ता नाही, मग ते लोक (चिनी सैन्य) इथपर्यंत कसे पोचले ? माझा सरकारवर पूर्ण विश्वास आहे आणि त्यांनी या प्रकरणात लक्ष द्यावे अशी माझी इच्छा आहे. मी स्वतः ही बाब गांभीर्याने घेत आहे आणि येथे रस्ता तयार करण्याची गरज आहे.

तापीर गाओ म्हणाले होते की ‘चगलगाम’ गावापासून १०० किलोमीटर अंतरावर वास्तविक नियंत्रण रेखा (LAC) आहे आणि जर चीन सैन्याने ‘चगलगाम’पासून २५ कि. मी अंतरावर पूल बांधला असेल तर याचा अर्थ असा की चीन आधीपासूनच ६०-७० कि. मी पर्यंत आत पोहोचला आहे.

आर्मीचे स्पष्टीकरण
तापीर यांच्या सनसनाटी दाव्याला उत्तर देताना सैन्याने म्हटले आहे की, “भारत आणि चीनमधील सीमाभागातील सर्व प्रश्न सोडविण्यासाठी मुत्सद्दी व लष्करी यंत्रणा स्थापन केली गेली आहे. भारत-चीन सीमाभागातील सर्व भागात शांतता व शांती कायम ठेवली पाहिजे यावर दोन्ही बाजू सहमत आहेत.”

आरोग्यविषयक वृत्त