Tattoo काढण्याआधी ‘या’ महत्त्वाच्या गोष्टींचा विचार नक्की करा ! जाणून घ्या

पोलिसनामा ऑनलाइन – अनेकांना शरीरावर टॅटू काढायला खूप आवडतं. परंतु जर तुम्ही टॅटू काढताना योग्य ती काळजी घेतली नाही तर याचे तुमच्या शरीरावर विपरीत परिणाम होऊ शकतात. टॅटू काढताना नेमकी काय काळजी घ्यावी याबद्दल आज आपण माहिती घेणार आहोत.

टॅटू ही एक मिनी सर्जिकल प्रोसिजर आहे. त्यामुळं टॅटू काढण्यापूर्वी टॅटू आर्टीस्टनं प्रत्येक ग्राहकांसाठी वेगळ्या सुया वापरणं, स्वच्छता राखणं, ग्लोव्हजचा वापर करणं गरजेचं आहे.

1) त्वचाविकार – अनेकांची त्वचा ही सेंसिटीव्ह असते. अशा वेळी टॅटू काढण्यापूर्वी खबरदारी घेणं गरजेचं आहे. एकच सुई अनेकदा वापरली गेल्यानं त्वचा विकार होण्याचीही शक्यता असते.

2) गंभीर समस्या – एचआयव्ह, हिपेटायटीस बी, हिपेटायटीस सी अशा आजारांचं संक्रमण होण्याचीही शक्यता असते. इतकंच नाही तर ज्या भागात तुम्ही टॅटू काढत आहात तिथं जर एखादी महत्त्वाची शीर किंवा रक्तवाहिनी असेल तर त्याला इजा पोहोचून त्यातून संसर्ग होऊन त्या भागाला गँगरीन होण्याचाही धोका असतो.

3) अ‍ॅलर्जिक रिअ‍ॅक्शन – टॅटू काढताना अनेक रंगाचे डाय वापरले जातात. यात फेरस ऑक्साईड हा घटक असतो. याचे विविध तापमानाला विविध रंग मिळतात. काळा, गडद आणि फिकट चॉकलेटी, लाल आणि टायटॅनियम ऑक्साईडपासून मिळणारा पांढरा अशा वेगवेगळ्या रंगाची शाई असते.

जो टॅटू काढून घेत आहे त्याची त्वचा त्यातील डायला संवेदनशील असू शकते आणि त्यामुळं त्वचेवर अ‍ॅलर्जी होऊ शकते. यात खाज येणं, फोड येणं, त्यातून पाण्यासारखा स्त्राव येणं असे प्रकार होऊ शकतात. त्वचेला संसर्गही होऊ शकतो.

4) एमआरआय चाचणी करताना समस्या – अनेकांना असं वाटतं की, टॅटू काढल्यानंतर एमआरआय चाचणी करता येत नाही. परंतु असं अजिबात नाही. टॅटू काढल्यानंतरही एमआरआय चाचणी करता येते. मात्र चाचणी झाल्यानंतर येणाऱ्या रिपोर्टमध्ये एमआरआयची प्रतिमा थोडी खराब होण्याची शक्यता असते.

5) रक्तदान करताना अडथळा – टॅटू काढल्यानंतर जवळपास 1 आठवडा कुणालाही रक्तदान करता येत नाही. कारण टॅटू काढताना वापरलेली शाई आणि घातक केमिकल्स हे आपल्या रक्तावाटे अन्य व्यक्तीच्या रक्तात मिसळू शकतात.

टीप – वरील लेख हा माहिती म्हणून देण्यात आलेला आहे. यातून आम्ही कोणताही दावा करत नाही. त्यामुळं काहीही करण्याआधी एकदा डॉक्टरांचा किंवा तज्ज्ञांचा सल्ला नक्की घ्या. कारण काही गोष्टी काहींना सूट होतात तर काहींना सूट होत नाहीत. तसेच काही लोकांना काही पदार्थांची अ‍ॅलर्जीही असते. त्यामुळं तुम्हाला अ‍ॅलर्जी असणारे पदार्थ वापरणं टाळावं.