तौसिफ शेख मृत्यूप्रकरण : जामखेडमध्ये रास्ता रोको

अहमदनगर : पोलिसनामा ऑनलाईन – कर्जतचे तौसिफ शेख यांना न्याय मिळावा व दोषी अधिका-यांवर कारवाई करण्यात यावी, या मागणीसाठी जामखेडला खर्डा चौकात आज मुस्लिम समाजाच्यावतीने आज दोन तास रस्तारोको आंदोलन करण्यात आले.
तौसिफ शेख आत्मदहनप्रकरणी सरकारकडून चौकशीच्या नावाखाली दिरंगाई सुरू आहे. शासनाकडून त्यांना न्याय मिळावा व जे कोणी अधिकारी यात दोषी असतील, त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात यावी. त्यांच्या मृत्यूस कारणीभूत ठरलेल्या शासकीय अधिकाऱ्यांविरोधात कडक कारवाई करण्यात यावी, अशी मागणीसाठी मुस्लिम समाजाच्यावतीने आक्रमक भूमिका समाजाच्यावतीने घेण्यात आली आहे. खर्डा चौकात रस्तारोको आंदोलन करण्यात आले.
हे आंदोलन तब्बल दोन तास झाले. त्यामुळे खर्डा चौक चक्काजाम झाला होता. कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, यासाठी पोलिसांची चोख बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.