Tax Refund | करदात्यांची दिवाळी ! CBDT ने 91.30 लाख करदात्यांना केला 1.12 लाख कोटी रुपयांचा कर परतावा

नवी दिल्ली : वृत्तसंस्था –  Tax Refund | केंद्रीय प्रत्यक्ष कर बोर्डाने (CBDT) चालू आर्थिक वर्षात आतापर्यंत करदात्यांना 1.12 लाख कोटी रुपये परत (Tax Refund) केले. प्राप्तीकर विभागाने (Income Tax Department) सांगितले की सीबीडीटीने 1 एप्रिल 2021 पासून 1 नोव्हेंबर 2021 च्या दरम्यान 91.30 लाखापेक्षा जास्त करदात्यांना 1,12,489 कोटी रुपये परत केले. यामध्ये व्यक्तीगत प्राप्तीकराच्या (Individual Taxpayers) प्रकरणांमध्ये 89,53,923 करदात्यांना 33,548 कोटी रुपये परत केले.

 

मूल्यांकन वर्ष 2021-22 चा आहे 58.22 लाख परतावा

 

विभागाने म्हटले की संस्थागत कर (Corporate Tax) अंतर्गत 1,75,692 करदात्यांना 78,942 कोटी रुपये परत करण्यात आले.
करदात्यांना परत केलेल्या रक्कमेत 11,086.89 कोटी रुपयांपैकी 58.22 लाख परतावा (Tax Refund) मूल्यांकन वर्ष 2021-22 चे आहेत.

 

यापूर्वी प्राप्तीकर विभागाने माहिती दिली होती की 1 एप्रिलपासून 26 एप्रिलच्या दरम्यान 10.83 लाख करदात्यांना 12,038 कोटी रुपये कर परतावा म्हणून परत करण्यात आले.
यानंतर सुद्धा अनेक करदाते कर परताव्याची प्रतीक्षा करत होते.

 

ऑगस्टपर्यंत परत केले होते 51,531 कोटी रुपये

 

प्राप्तीकर विभागाने आर्थिक वर्ष 2021-22 साठी 23 ऑगस्टपर्यंत 51,531 कोटी रुपये कर परतावा म्हणून जारी केले होते.
यामध्ये 21,70,134 प्रकरणात 14,835 कोटी रुपयांचा प्राप्तीकर परतावा आणि 1,28,870 प्रकरणात 36,696 कोटी रुपयांचा संस्थागत कर परताव्याचा समावेश होता.

 

आर्थिक वर्ष 2020-21 मध्ये 2.62 लाख कोटी रुपये 2.37 कोटीपेक्षा जास्त करदात्यांना परत करण्यात आले होते.
हे आर्थिक वर्ष 2019-20 च्या तुलनेत 42 टक्के जास्त आहेत. (Tax Refund)

 

ITR दाखल केल्याच्या 10 दिवसात येतो परतावा

 

प्राप्तीकर परतावा आयटीआर भरण्याच्या 10 दिवसांच्या आत करदात्यांच्या खात्यात जमा होतो.
जर कुणी करदाता कर परताव्याची प्रतीक्षा करत असेल तर त्याने आयटीआर भरल्याच्या दिवसाच्या आत आपले खाते तपासले पाहिजे.

 

Web Title : Tax Refund | cbdt returns rs 1 12 lakh crore to more then 91 lakh taxpayers tax refund income tax

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

COVAXIN च्या आपत्कालीन वापराला अखेर WHO ने दिली मंजूरी, मोठ्या कालावधीपासून प्रलंबित होते प्रकरण

Coronavirus in Maharashtra | दिलासादायक ! राज्यात गेल्या 24 तासात 1,519 रुग्ण ‘कोरोना’मुक्त, जाणून घ्या इतर आकडेवारी

Modi Government | मोदी सरकारकडून सर्वसामान्यांना दिवाळी भेट ! इंधनावरील टॅक्स घटवला, पेट्रोल 5 रूपयांनी तर डिझेल 10 रूपयांनी ‘स्वस्त’