‘टाटा’ची IT कंपनी TCS वर लागला जातोय चोरीचा आरोप ! कोर्टाकडून 2100 कोटींचा दंड, जाणून घ्या प्रकरण

नवी दिल्लीः वृत्तसंस्था – अमेरिकेच्या फेडरल अपील कोर्टाने आयटी क्षेत्रातील दिग्गज टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस (टीसीएस) ला मोठी चालना दिली आहे. कोर्टाने टीसीएसवरील व्यापार गुप्त चोरी प्रकरणात खालच्या कोर्टाचा निर्णय कायम ठेवला आहे. तथापि, फेडरल अपील कोर्टाने विस्कॉन्सिनच्या खालच्या कोर्टाद्वारे टीसीएसवर लादलेला दंड जास्त असल्याचे सांगून खालच्या कोर्टाला ते कमी करण्यास सांगितले आहे. शुक्रवारी टीसीएसने नियामक फाइलिंग दरम्यान ही माहिती शेअर बाजाराला दिली.

आता काय होईल – टीसीएसने म्हटले आहे की, ते इतर पर्याय शोधत आहेत, कारण त्यांना असा विश्वास आहे की, कंपनीने एपिक सिस्टमच्या Intellectual Property Rights चा गैरवापर केल्याचा कोणताही पुरावा नाही.

संबंधित कोर्टासमोर टीसीएस जोरदारपणे आपल्या स्थितीचा बचाव करेल. TCS वर intellectual property rights चोरी करुन उत्पादन तयार केल्याचा आरोप एपिक सिस्टमने केला होता.

या प्रकरणात कोर्टाने प्रथम टीसीएसवर 940 मिलियन डॉलर्सचा दंड ठोठावला, त्यानंतर तो 2016 मध्ये कमी करुन 420 मिलियन डॉलर्स केला होता, ज्यामध्ये 14 कोटी डॉलर नुकसान भरपाईचा समावेश आहे. 2016 च्या या निर्णयाच्या विरोधात टीसीएसने अमेरिकेच्या फेडरल कोर्ट ऑफ अपीलमध्ये याचिका दाखल केली होती.

टीसीएसने म्हटले आहे की, अपील न्यायालयाने अमेरिकन हेल्थकेअर सॉफ्टवेयर कंपनी एपिक सिस्टीम्ससह बौद्धिक संपत्ती हक्क प्रकरणात त्यांच्यावर लावण्यात आलेल्या 28 डॉलर (सुमारे 2100 कोटी रुपये) दंडाला घटनात्मकरित्या अत्यधिक घोषित केले आणि कंपनीवर लादलेल्या भरपाईची रक्कम कमी केली जावी, असा निर्णय दिला.