UP Election Result 2022 | उत्तर प्रदेशात भाजपची पुन्हा सत्ता, पण ओवैसींच्या AIMIM चं काय झालं? जाणून घ्या

लखनऊ : वृत्तसंस्था – UP Election Result 2022 | संपूर्ण देशाचे लक्ष लागून राहिलेल्या उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीच्या निकालात (UP Election Result 2022) भाजपने (BJP) दुसऱ्यांदा विजय मिळवला आहे. भाजपने स्पष्ट बहुमत मिळवले आहे. उत्तर प्रदेशात सध्याच्या निकालानुसार भाजप आघाडीवर आहे. त्याचवेळी उत्तर प्रदेशची निवडणूक लढवणाऱ्या असदुद्दीन ओवैसी (Asaduddin Owaisi) यांचा पक्ष AIMIM ची अवस्था अत्यंत बिकट झाल्याचे चित्र आहे. उत्तर प्रदेशात AIMIM नं अद्याप एकही खातं उघडलेलं नाही. ओवैसी यांनी ज्या जागांवर दावा करत होते, ते सर्व दावे खोटे ठरल्याचं पाहायला मिळत आहे.

 

उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीत (UP Election Result 2022) आतापर्यंत आलेल्या ट्रेंडमध्ये AIMIM ला आपलं एकही खातं उघडता आलेलं नाही. निवडणूक प्रचारादरम्यान ज्या पद्धतीने पक्षाच्या जागेवर दावा केला जात होता. ते सर्व दावे फोल ठरले आहेत. यामुळे ओवैसी निराश होण्याची शक्यता आहे. कारण ओवैसी यांना उत्तर प्रदेशातील मुस्लिम (Muslim) जनतेकडून खूप अपेक्षा होत्या.

उत्तर प्रदेशच्या ट्रेंडमध्ये भाजप आघाडीवर असल्यानं पक्षाचे कार्यकर्ते आणि समर्थक आनंद साजरा करत आहेत.
निवडणूक आयोगाच्या अधिकृत ट्रेंडनुसार, भाजप 276 जागांवर तर समाजवादी पार्टी (Samajwadi Party) 120 जागांवर आघाडीवर आहे.
योगी आदित्यनाथ (Yogi Adityanath) पुन्हा सरकार बनवताना दिसत आहेत. योगी आदित्यनाथ पुन्हा मुख्यमंत्री (CM) झाल्यानंतर ते इतिहास रचणार आहेत.
तसेच अनेक विक्रम त्यांच्या नावावर होणार आहेत.

 

Web Title :- UP Election Result 2022 | up election result 2022 asaduddin owaisi party aimim in results of up elections

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Nikki Tamboli Superbold Look | निक्की तंबोलीनं रिवीलिंग टॉप घालून इंटरनेटची वाढवली गर्मी, फोटो पाहून तुम्हीही व्हाल घायाळ

 

Pune Corporation | उरूळी देवाची आणि फुरसुंगी येथील टीपी स्किमचा प्रारुप आराखडा प्रसिद्ध करायला (PMC) सर्वसाधारण सभेची मान्यता

 

Pimpri Corona Update | पिंपरी चिंचवडमध्ये गेल्या 24 तासात 26 रुग्ण ‘कोरोना’मुक्त, जाणून घ्या इतर आकडेवारी

 

PMC Standing Committee | नगरसेवक पदाची मुदत संपली तरी स्थायी समिती विसर्जित होत नाही ! प्रसंगी न्यायालयात दाद मागणार – स्थायी समिती अध्यक्ष हेमंत रासने यांचा दावा