ICC World Cup 2019 : …तर टीम इंडिया ठरु शकते ‘अव्वल’

लंडन : विश्व चषकाचे सामने आता रंगात येऊ लागले असून पहिल्या चार क्रमांकासाठी प्रमुख संघांमधील चुरस वाढू लागली आहे. साखळी सामन्यांतील आता शेवटचे सामने राहिले असून त्यात पहिल्या, दुसऱ्या क्रमांकावर कोण राहणार यावर पैजा लागू लागल्या आहेत. भारताचे सर्वाधिक ५ सामने शिल्लक असून त्यातील एक महत्वाचा सामना जिंकल्यास भारत साखळी स्पर्धेत अव्वल ठरू शकतो आणि तो सामना आहे इंग्लडविरुद्धचा.

आज गुणतालिकेत १० गुणासह ऑस्ट्रेलिया अव्वल स्थानी आहे. मात्र, त्यांनी एक पराभव स्वीकारला असून त्यांचे तीन सामने शिल्लक राहिले आहेत. त्यांचे जास्तीतजास्त १६ गुण होऊ शकतात. त्यानंतर ९ गुणासह न्युझिलंड दुसऱ्या स्थानी असून त्यांचे यापुढील सामने ऑस्ट्रेलिया, इंग्लड यांच्याबरोबर आहेत. त्यामुळे त्या तिघातील कोणता तरी एका संघाचा नक्की पराभव होणार आहे. त्यामुळे इग्लंड, ऑस्ट्रेलिया आणि न्यूझिलंड यांच्यात उरलेल्या तीन सामन्यात सर्वांना सहा गुण मिळण्याची शक्यता नाही.

भारत आणि न्युझिलंड हे दोनच संघ आतापर्यंत या स्पर्धेत अपराजित राहिलेले आहेत. भारताचे सर्वाधिक ५ सामने अजून शिल्लक आहेत. त्यात अफगाणिस्तान, वेस्ट इंडिज, बांगला देश, श्रीलंका आणि इंग्लड यांच्याबरोबरचे सामने बाकी आहेत. त्यात आतापर्यंतची भारताची कामगिरी पाहिल्यास इंग्लड वगळता अन्य चार संघांविरुद्ध भारत सहज विजय मिळवू शकतो अशी सध्याची स्थिती आहे.

जर इंग्लडविरुद्ध भारताने विजय मिळविला तर भारत साखळी सामन्यांमध्ये १७ गुणांसह निर्विवादपणे अव्वल ठरण्याची शक्यता आहे.

आरोग्यविषयक वृत्त-
भारतातील ‘या’ ७ योगगुरूंचे जगभरात ‘फालोअर्स’, जाणून घ्या त्यांच्याबद्दल
लहान मुलांनाही शिकवा ही “योगासन” होतील फायदे
लहान मुलांची उंची वाढण्यासठी करा हे नैसर्गिक उपाय
मानसिक आरोग्य जपण्यासाठी झोप आहे महत्वाची