Airtel ची मोठी ऑफर ! कंपनी प्री-पेड रिचार्जवर देतेय 50% कॅशबॅक, 30 ऑक्टोबरपर्यंत असेल संधी

पोलीसनामा ऑनलाइन टीम  –   Bharti Airtel कडून प्री-पेड यूजर्सला एक खास ऑफर देण्यात येत आहे. या अंतर्गत यूजर्सना प्री-पेड रिचार्जवर 50 टक्केपर्यंतची कॅशबॅक ऑफर दिली जाईल. हे कॅशबॅक रिचार्जच्या पुढील तीन दिवसांच्या आत मिळेल. ही एक लिमिटेड पीरियड ऑफर आहे, जी 30 ऑक्टोबरपर्यंत राहणार आहे.

कसा घ्यायचा कॅशबॅकचा फायदा

या ऑफरचा फायदा केवळ cना मिळेल. यासाठी अमेझॉन प्राइमच्या अकाऊंटवरून लॉग-इन करावे लागेल आणि कॅशबॅक रिवॉर्ड कलेक्ट करावे लागेल. एयरटेलकडून 50% कॅशबॅकसाठी अमेझॉन पेवरून प्री-पेड प्लॅन रिचार्ज करावा लागेल. यावर यूजर्सला 50% आणि 40 रुपयांपर्यंत कॅशबॅक मिळेल. एयरटेल अ‍ॅप किंवा वेबसाइटवर जाऊन हा फायदा मिळणार नाही. एयरटेलच्या ऑफरमध्ये कोणत्याही प्रोमो कोडचा समावेश केला जाणार नाही. परंतु, तोच यूजर, जो अमेझॉन अकाऊंट होल्डर आहे, तोच हे रिवॉर्ड केलक्ट करू शकतो.

नवीन चीनी कंपन्यांशी भागीदारी नाही

एयरटेलने म्हटले की, त्यांच्याकडून चीनी कंपनी हुआई आणि एफटीई कोणतेही नवीन कॉन्ट्रॅक्ट देण्यात आलेले नाही. परंतु, एयरटेलकडून ज्या चायनीज वेंडरसोबत अगोदर भागीदारी केली गेली होती, त्यांच्यासोबत काम करणे जारी राहील. सध्या अन्य कंपन्या जसे की, नोकिया, सीसको आणि सीएनासोबत भागीदारीची शक्यता तपासली जात आहे. आयसीआयसीआय सिक्युरिटीनुसार, एयरटेलचा व्यवसाय चांगला राहणार आहे. आर्थिक वर्ष 2020-21 मध्ये टेलिकॉम कंपनीशी 40 लाखांपेक्षा जास्त नवे कस्टमर जोडले जाण्याची अपेक्षा आहे. सोबतच एयरटेलच्या प्रत्येक तिमाहीत मोबाइल रेव्हेन्यूमध्ये 3.3 टक्के ग्रोथ होण्याची शक्यता आहे.