1,000 रुपयांपेक्षा कमी किंमतीत येतात हे शानदार Earphones, ‘इथं’ पहा पूर्ण लिस्ट

नवी दिल्ली : वृत्त संस्था – जर तुम्ही आपल्यासाठी शानदार साऊंड क्वालिटीचे ईयरफोन खरेदी करण्याचा विचार करत असाल, परंतु बजेट कमी असेल, तर चिंता करण्याची गरज नाही. कारण आम्ही तुम्हाला सांगणार आहोत, भारतीय बाजारात असलेल्या काही शानदार ईयरफोनबाबत, ज्यांची किंमत 1000 रुपयांपेक्षा कमी आहे. जाणून घेवूयात या ईयरफोनबाबत सविस्तर…

boAt Rockerz 240

boAt Rockerz 240 खुप शानदार ब्लूटूथ ईयरफोन आहे. या ईयरफोनमध्ये मायक्रो-फोनसोबत 10mm चे ड्रायव्हर दिले आहेत. याशिवाय या ईयरफोनमध्ये दमदार बॅटरी दिली आहे, जी सहा तास बॅकअप देते. विशेष म्हणजे याची बॅटरी फास्ट चार्जिंग फिचर सपोर्ट करते. तर, या नेकबँड ईयरफोनची किंमत 999 रुपये आहे.

Ubon CL-60

Ubon CL-60 नेकबँड ईयरफोन 999 रुपयांच्या प्राईस टॅगसोबत बाजारात उपलब्ध आहे. या ईयरफोनमध्ये मॅग्नेटिक ईयरबड्स दिले आहेत. याशिवाय ईयरफोनमध्ये डीप-बास, तीन बटन आणि मायक्रो-फोनची सुविधा आहे. अन्य फिचर्सबाबत बोलायचे तर कंपनीने यामध्ये 60mAh ची बॅटरी दिली आहे.

Zebronics ZEB-SLINGER

Zebronics ZEB-SLINGER शानदार ईयरफोनपैकी एक आहे. या ईयरफोनमध्ये रबरचा नेकबँड दिला आहे. याशिवाय, यात 12mm चे ड्रायव्हर दिले आहेत. तसेच दमदार बॅटरी सपोर्ट आहे. कंपनीचा दावा आहे की, याची बॅटरी 12 तासांचा बॅकअप देते. तर, याची किंमत 879 रुपये आहे.

PTron Avento Pro

यामध्ये ब्लॅक कलर ऑपशन आहे. तसेच वायर खुप लवचिक असल्याने कॅरी करण्यास सोपा आहे. यात मायक्रो-फोनसह 80mAh ची सुविधा देण्यात आली आहे, जी सिंगल चार्जमध्ये 100 तासांचा बॅटरी बॅकअप प्रदान करते. तर, या ईयरफोनची किंमत 549 रुपये आहे.

HolyHigh

या ईयरबड्सची किंमत 949 रुपये आहे. यात हायर फ्रिक्वेंसी रिस्पॉन्स आणि 10mm ऑडियो ड्रायव्हर देण्यात आला आहे. यामध्ये बिल्ट-इन मॅग्नेट आहे. याशिवाय यात दमदार 10 तासांचा बॅटरी बॅकअप मिळतो.

नोट : 1,000 रुपयांपेक्षा कमी किंमतीच्या नेकबँडच्या यादीत ई-कॉमर्स साईटवर उपलब्ध माहितीनुसार बनवण्यात आली आहे.