‘BSNL’चा ग्राहकांना ‘झटका’, आता ग्राहकांना मिळणार नाही ‘अनलिमिटेड’ कॉलिंगची ‘सुविधा’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – भारताच्या टेलिकॉम क्षेत्रातील सार्वजनिक कंपनी BSNL नेे आपल्या ५ कोटी ग्राहकांना मोठा झटका दिला आहे. कंपनीने आपल्या प्रीपेड ग्राहकांची अनलिमिटेड फ्री कॉलिंग सुविधा बंद केली आहे. BSNL ने रुपये १८६, ४२९, ४८५, ६६६ आणि रुपये १,६९९ च्या प्रीपेड प्लॅनमधील अनलिमिटेड फ्री कॉलिंग सेवा बंद केली आहे.

दिवसाला फक्त साडे चार तास कॉलिंग फ्री
या प्लॅनमध्ये कंपनीने बदल केले असून आता कंपनी आपल्या ग्राहकांना अनलिमिटेड कॉलिंगच्या जागी प्रतिदिन २५० मिनिट फ्री देणार आहे. म्हणजेच युजर्स एक दिवसाला फक्त साडे चार तास फ्री कॉलिंगची सुविधा देणार आहे. त्यामुळे BSNL च्या ग्राहकांना आता अनलिमिटेड कॉलिंगच्या सुविधेचे लाभ घेता येणार नाही.

एकीकडे इतर टेलिकॉम कंपन्यांचे आव्हान BSNL पुढे असताना कंपनीने आपल्या ग्राहकांना नाराज केले आहे. मागील महिन्यात कंपनीने इतर कंपन्याना टक्कर देण्यासाठी अनेक प्लॅन बाजारात आणले होते. परंतू आता कंपनीने यूजर्सची अनलिमिडेट कॉलिंगची सुविधा बंद केल्यामुळे ग्राहक नाराज होऊन दुसऱ्या कंपन्याकडे वळण्याची शक्यता आहे.

२५० मिनिटांच्या वापरानंतर १ पैसे मिनिट असे शुल्क
BSNL ने या प्लॅनमध्ये प्रतिदिन २५० मिनिटांनंतर १ पैसे प्रति मिनिट असे शुल्क आकारणार आहेत. म्हणजे एखादा ग्राहक २५० मिनिटानंतर कॉल करेल तर त्याला त्या कॉलमागे शुल्क द्यावे लागेल. जर अकाऊंटमध्ये बॅलन्स नसेल तर ग्राहक कॉल करु शकणार नाहीत. याशिवाय जर ग्राहकाचे २५० मिनिटातील काही मिनिट शिल्लक राहिले तर ग्राहकाला ते पुढील दिवशी फॉरवर्ड करुन वापरता येणार नाहीत.

आरोग्यविषयक वृत्त –