Google Pay वरून फ्रीमध्ये नाही होऊ शकणार मनी ट्रान्सफर, वापरकर्त्याला द्यावा लागेल चार्ज, जाणून घ्या

पोलीसनामा ऑनलाइन टीम  –   डिजिटल पेमेंट प्लॅटफॉर्म गुगल पे पुढील वर्षी जानेवारीपासून पीअर-टू-पीअर पेमेंट सुविधा बंद करणार आहे. त्या बदल्यात, कंपनी एक नवीन इन्स्टंट मनी ट्रान्सफर पेमेंट सिस्टिम समाविष्ट करेल, ज्यासाठी वापरकर्त्यास शुल्क भरावे लागेल. मात्र, किती शुल्क भरावे लागेल. यावेळी याबाबत कोणतीही माहिती समोर आलेली नाही.

वापरकर्त्याला भरावे लागेल शुल्क :

दरम्यान, जेव्हा आपण आपल्या बँक खात्यात पैसे हस्तांतरित करता तेव्हा पैसे हस्तांतरित करण्यास एक ते तीन दिवस लागतात. त्याच वेळी, पेमेंट हस्तांतर डेबिट कार्डद्वारे त्वरित केले जाते. कंपनीने सपोर्ट पेजद्वारे जाहीर केले आहे की, जेव्हा आपण डेबिट कार्डद्वारे पैसे हस्तांतरित करता तेव्हा 1.5 टक्के किंवा 1 0.31 डाॅलर (जे अधिक असेल) शुल्क आकारला जातो. अशा परिस्थितीत इन्स्टंट मनी ट्रान्सफरवरही गुगलकडून शुल्क आकारले जाऊ शकते.

9to5Google च्या अहवालानुसार, ही सेवा जानेवारी 2021 पासून बंद होईल. सध्या, (Google) पे मोबाइल किंवा pay.google.com वरून पैसे पाठविण्याची आणि प्राप्त करण्याची परवानगी देते. दरम्यान, वेब अ‍ॅप बंद करण्याबाबत गुगलने नोटीस जाहीर केली आहे. अशा परिस्थितीत, वापरकर्ते 2021 च्या सुरुवातीपासून Pay.google अ‍ॅपद्वारे पैसे हस्तांतरित करू शकणार नाहीत. यासाठी वापरकर्त्याला गुगल पे वापरावा लागेल. तसेच गुगलने असेही स्पष्टीकरण दिले आहे की गुगल पेचे सपोर्ट पेजही पुढच्या वर्षी जानेवारीपासून बंद केले जाईल.

गुगल पेमध्ये मोठे बदल

गेल्या आठवड्यात गुगलने बरीच फीचर सादर केली आहेत. हे सर्व वैशिष्ट्य अमेरिकन अँड्रॉइड आणि आयओएस वापरकर्त्यांसाठी आणले गेले आहे. याव्यतिरिक्त कंपनीने गुगल पेचा लोगोही बदलला आहे.

You might also like