4000 रुपयांची लाच घेताना ‘महावितरण’ची महिला टेक्निशियन अ‍ॅन्टी करप्शनच्या जाळ्यात

बीड : पोलीसनामा ऑनलाइन – घरगुती लाईटचे मीटर बसवण्यासठी 4 हजार रुपयांची लाच स्विकारताना गेवराई महावितरण कार्यालयातील महिला टेक्निशियनला गेवराई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले. या कारवाईमुळे महावितरणमधील भ्रष्टाचार समोर आला आहे. काजल भीमराव खोब्रागडे (वय-24) असे रंगेहाथ पकडण्यात आलेल्या महिला कर्मचाऱ्याचे नाव आहे.

तक्रारदार (वय-32) व्यक्तीला त्यांच्या घरामध्ये लाईटचे मीटर बसवण्यासाठी महावितरण कार्यालयात सर्व कागदपत्र सादर केली होती. घरगुती लाटईचे मीटर बसवण्यासाठी काजल खोब्रगडे यांनी आज तक्रारदाराकडे मीटर बसवण्यासाठी 4 हजार रुपयांची लाच मागितली. तक्रारदाराला लाच देणे मान्य नसल्याने त्यांनी गेवराई लाचलुपचत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली. विभागाच्या अधिकाऱ्यांनी पंचासमक्ष पडताळणी केली असता महिला टेक्निशियन काजल यांनी चार हजार रुपयांची मागणी करून स्विकारण्याचे कबुल केल्याचे स्पष्ट झाले. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने महावितरण कार्य़ालयात सापळा रचून तक्रारदार यांच्याकडून लाच स्विकारताना रंगेहाथ पकडले.

सरकारी कामासाठी लोकसेवक लाचेची मागणी करीत असल्यास नागरिकांनी लाचलुचपत प्रतिबंध विभागाकडे तक्रार करावी, असे आवाहन लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या वतीने करण्यात आले आहे. तसेच लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या १०६४ या हेल्पलाईन क्रमांकावर संपर्क साधावा.

Visit – policenama.com