धक्कादायक ! आधी नाचून दाखव मगच FIR दाखल करु, UP पोलिसांनी 16 वर्षीय मुलीकडे मागणी

पोलिसनामा ऑनलाईन – उत्तर प्रदेशात मागील काही दिवसांपासून अनेक चित्रविचत्र घटना घडत असल्यामुळे पोलीस वादाच्या भोवर्‍यात अडकत आहेत. गोविंद नगर पोलिसांबद्दल संताप व्यक्त करणार्‍या एका तरुणीचा व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल होत आहे. कानपूरजवळील दुबाऊलीमधील गोविंद नगर येथे राहणार्‍या तरुणीने घरमालकाच्या पुतण्यासंदर्भात तक्रार केली. यानंतर पोलिसांनी आरोपीवर कारवाई करण्याऐवजी मला पोलीस स्थानकात डान्स करण्याचा सांगितल्याचा आरोप अल्पवयीन मुलीने केला आहे.

भाड्याच्या घरात राहणार्‍या या मुलीचे कुटुंब जागरण गोंधळ करुन उदर्निवाह करते. काही दिवसांपूर्वी घर मालकाचा पुतण्या आणि या मुलीच्या कुटुंबामध्ये वाद झाला. त्यावेळी घरमालकाच्या पुतण्याने मुलीची छेड काढली. त्याशिवाय कुटुंबाला घर सोडण्यासाठी सांगून त्यांचे सामान घराबाहेर फेकून दिले. अनुप यादव असे आरोपीचे नाव आहे. त्याने घरात प्रवेश करुन हिंसा केल्याचा आरोप मुलीच्या आईने केला आहे. 26 जुलै रोजीच्या प्रकारानंतर 7 ऑगस्टच्या रात्री माझी मुलगी बाजारामधून घरी येत असतानाच घरमालकाच्या पुतण्याचे तिची छेड काढली. त्यानंतर आम्ही गोविंद नगरचे पोलीस निरीक्षक अनुराग मिश्रा यांच्याकडे तक्रार करण्यासाठी गेलो. तर त्यांनी माझ्या मुलीली आधी नाचून दाखव त्यानंतरच आम्ही तक्रार (एफआयआर) दाखल करुन घेऊ असे सांगितले.