Tejaswini Pandit | तेजस्विनी पंडितची ‘ती’ POST वायरल; केले ‘या’ व्यक्तीचे कौतुक…

पोलीसनामा ऑनलाईन टीम – मराठी सिनेसृष्टीतील (Marathi Cinema) एक उत्तम अभिनेत्री म्हणून तेजस्विनी पंडित (Tejaswini Pandit) ला ओळखले जाते. तेजस्विनीने तिच्या अभिनयाने चाहत्यांवर भुरळ पाडली आहे. तेजस्विनीने आतापर्यंत अनेक चित्रपट, वेब सिरीजतून (Web Series) आपला ठसा उमटवला आहे. याचबरोबर सोशल मीडियावर तेजस्वी (Tejaswini Pandit) ही नेहमीच सक्रिय असते. तिचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर अनेकदा वायरल होताना दिसतात. आता अशाच पद्धतीची तिची एक पोस्ट सध्या सोशल मीडियावर जोरात व्हायरल होताना दिसत आहे.

 

तेजस्वीचे अनेक चित्रपट गाजले त्यापैकीच एक चित्रपट म्हणजे ‘मी सिंधुताई सपकाळ’ (Mee Sindhutai Sapkal) या चित्रपटात तेजस्विनीने सिंधुताईंची भूमिका साकारली होती. यावेळी तिने अक्षरशः ती भूमिका जगली देखील होती. या भूमिकेसाठी तिला अनेक राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय पुरस्कार देखील मिळाले होते आणि ज्यावेळी सिंधुताई यांचे 5 जानेवारी रोजी हृदयविकाराचा झटक्याने (Heart Attack) निधन झाले ही बातमी कळताच तेजस्वीला मोठा धक्का बसला होता. आता उद्या सिंधुताई यांची जयंती त्याच निमित्ताने तेजस्विनी ने ही पोस्ट शेअर केली आहे.

 

तेजस्विनीने (Tejaswini Pandit) तिच्या Instagram अकाउंट वर एक फोटो शेअर करत अतिशय सुंदर असे कॅप्शन त्यावर दिले होते तेजस्वीनीने असे म्हंटले कि, “फार गाजावाजा नाही, कुठलेही अजेंडे नाही, गर्दी नाही, अत्यंत साधेपणाने एकाच व्यक्तिमत्त्वाला साजरा करण्यासाठी एकत्र आलो…. सिंधुताई सपकाळ! माई , आठवण यायला आम्ही तुम्हाला विसरलोच नाही…! उलट चित्रांमधून तुम्हाला पुन्हा अनुभवता आलं ! मित्रांनो, माईंच्या वाढदिवसाचं औचित्य साधून त्यांच्या स्मरणार्थ आयोजित केलेलं आणि प्रणव सातभाईने (Pranav Satbhai) काढलेलं डिजिटल पोर्ट्रेट्सचं प्रदर्शन हे आता तुमच्यासाठी खुलं आहे,
जरूर बघून या…! शेवटच्या फोटो मध्ये वेळ आणि लोकेशन सुद्धा आहे”.
तेजस्विनीची हि पोस्ट सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात वायरल होत आहे”.

 

तेजस्वीनीच्या वर्क फ्रंट बद्दल बोलायचे झाल्यास ती आता लवकरच बहुचर्चित ‘आदिपुरुष’ (Adipurush)
या बॉलिवूड (Bollywood) चित्रपटात झळकणार आहे.
याबद्दलची माहिती या आधीच तेजस्विनीने चित्रपटाचा पोस्टर शेअर करत चाहत्यांना दिली होती.
आता ‘आदिपुरुष’ मध्ये तिला पाहण्यासाठी चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत.

 

Web Title :- Tejaswini Pandit | tejaswini pandit shared special wrote special note for sindhutai sapkal on her birthday latest instagram post

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

MP Supriya Sule | ‘… त्याशिवाय बातमी होत नाही ना’; सुप्रिया सुळेंचा गजानन कीर्तिकरांना टोला

Sanjay Raut | संजय राऊतांची एकनाथ शिंदेंवर खोचक टीका; म्हणाले – ‘फुटिरांच्या गटात एक शिंदे कायम …’

Eng vs Pak Final | पाकिस्तानचा कॅप्टन बाबर आझमच्या नावावर लाजीरवाणा विक्रम, जाणून घ्या काय आहे तो विक्रम?