महिला डॉक्टरचा खून केल्यानंतर मृतदेह जाळल्यानंतर एकाला अटक, ‘लैंगिक’ अत्याचार केल्याचा संशय

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – तेलंगणा हैद्राबाद येथे एका डॉक्टर तरुणीची हत्या करून जाळण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला होता. यानंतर देशभरातून या घटनेबाबत हळहळ व्यक्त केली जात होती. अशात पोलिसांनी सीसीटीव्हीच्या माध्यमातून तात्काळ कारवाई करत एका आरोपीला यासंदर्भात अटक केली आहे. तपासानंतर तरुणीवर लैंगिक अत्याचार केले गेले असल्याचा संशय पोलिसांना आहे. प्रियांका रेड्डीचा जळालेला मृतदेह मिळाल्याने तिच्या कुटुंबियांना धक्का बसला होता. त्यानंतर पोलिसांनी तपास सक्रिय करत याबाबत अनेक सीसीटीव्ही फुटेज तपासले होते.

प्रियांकाची स्कुटर शानदार टोलनाक्याजवळ पंक्चर झाली होती. यावेळी तिने आपल्या बहिणीला फोन केला आणि मला या ठिकाणी भीती वाटत असल्याचे सांगितले आणि फोन कट झाला. यानंतर थेट प्रियांकाचा मृतदेह सापडल्याने मधल्या काळात तिच्यासोबत नेमके काय झाले याचे उत्तर अजूनही पोलिसांना सापडलेले नाही.

प्रियांकाचा फोन अचानक कट झाल्याने घाबरलेल्या बहिणीने याबाबत घरी सांगितले आणि घरच्यांनी तात्काळ पोलीस स्टेशनमध्ये धाव घेतली. पोलिसांनी तपास सुरु केला असता शानदार टोलनाक्यापासून २५ किलोमीटर अंतरावर असलेल्या सबवेमधे तिचा जळालेला मृतदेह सापडला. गळ्यातील लॉकेटवरून तिच्या मृतदेहाची ओळख पटू शकली.

या खुनाचे गूढ उकळण्यासाठी पोलिसांनी आसपास असलेले सर्व सीसीटीव्ही फुटेज पहायला सुरुवात केली आहे. दहा पथके नेमून पोलिसांनी तपासाला सुरुवात केली आहे. तसेच श्वानपथकाच्या मदतीने देखील अधिक तपास केला जात आहे.

महिला आयोगाच्या राष्ट्रीय अध्यक्ष चिडल्या
महिला आयोगाच्या राष्ट्रीय अध्यक्षा रेखा शर्मा यांनी याबाबत आपला रोष व्यक्त करत सध्या रस्त्यावर लांडगे फिरत असून ते महिलांवर झडप घालण्याच्या तयारीत आहेत, त्यामुळे लवकरात लवकर आरोपींना पकडण्यात यावे आणि आरोप सिद्ध होताच त्यांना फासावर लटकवावे अशी मागणी महिला आयोगाने केली आहे.

प्रियांका ही पेशाने पशु वैद्यकीय क्षेत्रात होती. कोल्लूर येथील जनावरांच्या दवाखान्यात जाण्यासाठी ती आपल्या घरून निघाली होती. टोलनाक्याजवळ आल्यावर तिने गाडी तेथेच लावली आणि टॅक्सी करून कामावर गेली. मात्र कामावरून येताना स्कुटर पंक्चर असल्याचे तिच्या लक्षात आले तेव्हा तिने बहिणीला फोन करून याबाबत सांगितले तेव्हा बहिणीने तिला टॅक्सी करून घरी ये असे सुचवले. मात्र प्रियंकाने काही लोक माझी मदत करत आहेत असे सांगितले आणि फोन ठेवला. त्यानंतर तिचा फोन बंद पडला.

प्रियांकाच्या या धक्कादायक मृत्यू नंतर ट्विटरवर #RippriyankaReddy हा हॅशटॅग मोठ्या प्रमाणावर ट्रेंडींमध्ये आला असून या घटनेबाबत अनेकांकडून खेद व्यक्त केला जात आहे.

Visit : Policenama.com