‘गुणवंत’ पोलिस निरीक्षकाचे तडकाफडकी निलंबन

टेंभूर्णी : पोलीसनामा ऑनलाईन – टेंभूर्णी पोलीस ठाण्याच्या पोलीस निरीक्षकाला तडकाफडकी निलंबीत करण्यात आले आहे. टेंभूर्णी येथे रुजू झाल्याच्या चार महिन्यांतच त्यांच्याविरोधात तक्रारी आल्याने त्यांना निलंबित करण्यात आले आहे.

संतोष गिरीगोसावी असे निलंबित करण्यात आलेल्या पोलीस निरीक्षकाचे नाव आहे.

संतोष गिरीगोवासी हे मागील चार महिन्यांपुर्वीच टेंभूर्णी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक म्हणून रूजू झाले होते. त्यांनी रुजू झाल्यानंतर आपला वचक निर्माण केला होता. मात्र त्यांच्याविरोधात अनेक तक्रारी करत त्यांना तेथून हटविण्याची मागणी करण्यात आली होती. त्यानंतर गिरीगोसावी यांच्यावर कर्तव्यात हलगर्जीपणा केल्याची तक्रार पोलीस अधिक्षक यांच्याकडे आल्यानंतर त्याची दखल घेण्यात आली. त्यानंतर त्यांना तात्काळ निलंबित करण्याचे आदेश दिले आहेत.

आरोग्यविषयक वृत्त –

एक रामबाण उपाय जो तुम्हाला म्हातारपणीही देतो तारूण्याचा अनुभव 

“केळी” आरोग्यासाठी उपयुक्त 

बाहेर जेवण करणे ठरू शकते मधुमेहाला निमंत्रण 

अचानक येणारा हृदयविकाराचा झटका रोखता येऊ शकतो