Mantralaya Officers Transfer | ठाकरे सरकारचा सरकारी बाबूंना दणका ! तब्बल 103 अधिकाऱ्यांच्या बदल्या

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन (Policenama Online) – फोन टॅप प्रकरणातील (phone tap Case) गोपनीय माहिती विरोधकांच्या हाती लागल्याने राज्यातील ठाकरे सरकारने (Thackeray government) अधिकाऱ्यांच्या बदल्यांचा धडाका लावला आहे. आता मंत्रालयातील तब्बल 103 सहायक कक्ष अधिकाऱ्यांच्या बदल्या (Mantralaya Officers Transfer) केल्या आहे. ठाकरे सरकारने मंत्रालयातील अधिकाऱ्यांच्या बदल्या (Mantralaya Officers Transfer) करुन सरकारी बाबूंना चांगलाच दणका दिला आहे. याशिवाय या आदेशाविरोधात भूमिका घेतल्यास कारवाईचा इशारा देखील दिला आहे.

मुंबई पोलीस (Mumbai Police) दल आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या (administrative officers) बदल्यांचे सत्र सुरु झाले आहे. आता राज्याचा गाडा ज्या मंत्रालयातून चालवला जातो. तेथील अधिकाऱ्यांची उचलबांगडी करण्यात आली आहे. मंत्रालयामध्ये एकाच वेळी 103 सहायक कक्ष अधिकाऱ्यांची बदली (Assistant Cell Officers) करण्याचा आदेश काढण्यात आला आहे.

एकाच संयुक्त आदेशाने बदल्यांची ऑर्डर काढण्यात आली आहे. या आदेशामुळे अधिकारी वर्गामध्ये एकच खळबळ उडाली आहे. ठाकरे सरकारने बदली करताना गृह, सामान्य प्रशासन, उद्योग, शालेय शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांच्या बदल्या करुन या विभागीतील अधिकाऱ्यांना मोठा धक्का दिला आहे.

महत्त्वाचे म्हणजे, आदेश कार्यमुक्तीचे असून याबद्दल संबंधित विभागाला दुसरे आदेश काढण्याची आवश्यकता नाही.
या कर्मचाऱ्यांना 2 ऑगस्ट 2021 रोजी बदलीच्या ठिकाणी हजर रहावे लागणार आहे.
जर अधिकारी हजर झाला नाही तर त्याच्याविरोधात शासन निर्णय 23 डिसेंबर 2016 शिस्तभंगाविषयक कारवाई करण्यात येणार आहे.
बदली झालेल्या कर्मचारी आणि अधिकाऱ्यांनी जर बदली रद्द करणे,
शिफारस करणे, दबावासाठी पत्र जोडल्यास त्यांची ही कृती गैरवर्तणूक समजली जाईल आणि त्यांच्याविरोधात कठोर कारवाई कोली जाईल, असा इशारा देण्यात आला आहे.

याशिवाय आहरण व संवितरण अधिकारी, अधिदान व लेखाधिकारी यांना कळवण्यात आले की,
उपरोक्त कर्मचाऱ्यांचे 2 ऑगस्ट 2021 पासूनचे वेतन कोणत्याही परिस्थितीमध्ये पूर्वीच्या विधातून आदा करण्यात येऊ नये.
अन्यथा त्यांना व्यक्तीश: जबाबदार धरण्यात येईल, अशी कडक सूचना देखील देण्यात आली आहे.
ज्या कर्मचारी आणि अधिकारी यांची बदली झाली आहे,
तिथे रुजू झाल्यावर तातडीने महिती सामान्य प्रशासन विभागाला तात्काळ सादर करावी लागणार आहे.

Web Title :- thackeray govt slaps government officers 103 officials in the mantralaya transferred

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Diabetes cure | डायबिटीजच्या रूग्णांसाठी खुशखबर ! बायोकॉनच्या नव्या औषधाला मंजूरी; जाणून घ्या कसा फायदा मिळणार

IAS Transfer | राज्यातील 14 सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्या, प्रताप जाधव यांची ‘यशदा’च्या उप महासंचालक पदी नियुक्ती