3 लाखाची लाच घेणारे 2 पोलिस उपनिरीक्षक अ‍ॅन्टी करप्शनच्या जाळ्यात

ठाणे : पोलीसनामा ऑनलाइन- दाखल गुन्हयात अटक न केल्याबद्दल 3 लाखाची लाच स्विकारणार्‍या दोन पोलिस उपनिरीक्षकांना  लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने अटक केली आहे. एकाचवेळी आणि एकाच प्रकरणात 2 पोलिस उपनिरीक्षकांना 3 लाख रूपयाची लाच स्विकारताना पकडल्याने पोलिस दलात प्रचंड खळबळ उडाली आहे.

पोलिस उपनिरीक्षक प्रशांत बाळासाहेब पासलकर (32) आणि पोलिस उपनिरीक्षक नजीव नजीर इनामदार (38) अशी त्यांची नावे आहेत. ते दोघेही पालघर जिल्हयातील बोईसर पोलिस ठाण्यात कार्यरत आहेत. तक्रारदार यांच्यावर बोईसर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल होता. दाखल गुन्हयात अटक न केल्याबद्दल पोलिस उपनिरीक्षक पासलकर आणि इनामदार हे तक्रारदारास 3 लाखाची लाच मागत होते. तक्रारदाराची लाच देण्याची इच्छा नसल्याने त्यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दिली.

तक्रार प्राप्‍त झाल्यानंतर अ‍ॅन्टी करप्शनच्या पथकाने दि. 12, दि. 14 आणि दि. 21 फेब्रुवारी रोजी तक्रारीची पडताळणी केली. त्यामध्ये पोलिस उपनिरीक्षक पासलकर आणि इनामदार हे लाच मागत असल्याचे निष्पन्‍न झाले. अ‍ॅन्टी करप्शनच्या पथकाने सापळा रचला. लाचेची रक्‍कम देताना दीड लाख रूपयाच्या खर्‍या नोटा तर दीड लाख रूपयाच्या डमी नोटा वापरण्यात आल्या. पोलिस उपनिरीक्षक पासलकर आणि इनामदार यांनी लाचेची रक्‍कम स्विकारल्यानंतर त्यांना पकडण्यात आले. त्यांच्याविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्हयाचा पुढील तपास चालु आहे.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
WhatsAPP
You might also like