Thane ACB Trap | महिलेकडून 18 हजार रुपये लाच घेताना पोलीस अँन्टी करप्शनच्या जाळ्यात

ठाणे : पोलीसनामा ऑनलाइन – प्राण्यांचा छळ केल्याप्रकरणी कल्याण तालुका पोलीस ठाण्यात (Kalyan Taluka Police Station) दाखल असलेल्या गुन्ह्यात अटक न करण्यासाठी महिलेकडून 18 हजार रुपये लाच स्वीकारताना पोलीस हवालदाराला (Police Constable) ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (Thane ACB Trap) सापळा रचून रंगेहाथ पकडले. धनंजय लक्ष्मण फर्डे Dhananjay Laxman Ferde (वय-49) असे लाचखोर पोलीस हवालदाराचे नाव आहे. ठाणे एसीबीच्या (Thane ACB Trap) पथकाने ही कारवाई गुरुवारी (दि.2) दुपारी पावणे दोनच्या सुमारास केली.

 

याबाबत 33 वर्षीय महिलेने गुरुवारी ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे (Thane ACB Trap) तक्रार केली आहे. तक्रारदार महिलेसह इतर दोन महिलांविरुद्ध कल्याण तालुका पोलीस ठाण्यात प्राण्यांचा छळ केल्याप्रकरणी (Animal Cruelty Prevention Act) गुन्हा (FIR) दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्याचा तापास धनंजय फर्डे यांच्याकडे असून गुन्ह्यात अटक न करण्यासाठी फर्डे यांनी प्रत्येकी 8 हजार प्रमाणे 24 हजार रुपये लाचेची मागणी केली. तडजोडी अंती 18 हजार रुपये देण्याचे ठरले. दरम्यान, महिलेने ठाणे एसीबीकडे तक्रार केली.

एसीबीच्या पथकाने पंचासमक्ष पडताळणी केली असता पोलीस हवालदार धनंजय फर्डे यांनी तक्रारदार महिलेसह इतर तीन महिलांकडे प्रत्येकी 8 प्रमाणे 24 हजार रुपये लाचेची मागणी करुन तडजोडी अंती 18 हजार रुपये स्वीकारण्याचे कबूल केले. एसीबीच्या अधिकाऱ्यांनी सापळा रचून फर्डे यांना तक्रारदार महिलेकडून 18 हजार रुपये लाच घेताना रंगेहाथ पकडले.

 

ही कारवाई पोलीस अधीक्षक सुनिल लोखंडे (SP Sunil Lokhande),
अपर पोलीस अधीक्षक अनिल घेरडीकर (Addl SP Anil Gherdikar)
यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक पल्लवी ढगे पाटील (Police Inspector Pallavi Dhage Patil),
पोलीस अंमलदार कोळी, बर्गे यांच्या पथकाने केली.

 

Web Title :- Thane ACB Trap | Police in anti-corruption net while taking bribe of 18 thousand rupees from woman

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Pune Chinchwad Bypoll Election | बंडखोरी झाली नसती तर विजय आमचाच होता, निकालानंतर नाना काटेंची प्रतिक्रिया

Nandurbar Police | नंदुरबार पोलिसांकडून अंमली पदार्थ विरोधी अभियानास सुरुवात, 1 हजार विद्यार्थ्यांना दिली शपथ

Chhatrapati Sambhajinagar Crime News | सैराटची पुनरावृत्ती ! प्रेमप्रकरणातून एका 16 वर्षीय युवकाचा खून