Pune Chinchwad Bypoll Election | बंडखोरी झाली नसती तर विजय आमचाच होता, निकालानंतर नाना काटेंची प्रतिक्रिया

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Chinchwad Bypoll Election | चिंचवड विधानसभेच्या पोटनिवडणुकीत भाजपच्या अश्विनी जगताप (BJP Ashwini Jagtap) यांनी राष्ट्रवादीचे नाना काटे (NCP Nana Kate) यांचा पराभव केला. निवडणुकीच्या निकालानंतर बोलताना नाना काटे यांनी सांगितले, चिंचवडमध्ये महाविकास आघाडीत (Mahavikas Aghadi) बंडखोरी झाली नसती, तर विजय आमचाच होता. बंडखोरीचा फटका बसला. तसेच शेवटच्या दोन दिवसांमध्ये भाजपकडून पैशांचे वाटप करण्यात आले. त्यामुळे हा पराभव झाला असून मी पराभव (Pune Chinchwad Bypoll Election) मान्य करत आहे. तसेच येथू पुढे अधिक जोमाने काम करु असेही नाना काटे यांनी सांगितले.

 

चिंचवडमध्ये झालेल्या तिरंगी लढतीत भाजपला आपला गड राखण्यात यश आले आहे. पराभवानंतर माध्यमांशी बोलताना नाना काटे म्हणाले, महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी मेहनत घेतली. पण, पराभव झाला. हा पराभव मान्य आहे. आम्ही कुठे कमी पडलो नाही. मतदार माझ्या सोबत होते मात्र भाजपने शेवटच्या दोन दिवसांत पोलीस बंदोबस्तात पैशांचे वाटप केले. भरमसाट पैशांचे वाटप झाले. भाजपला सहानभुती असती तर त्यांनी पैशांचे वाटप केले नसते. पराभवाने खचून न जाता पुन्हा जोमाने कामाला लागणार असल्याचे नाना काटे यांनी सांगितले.

कलाटेंनी फॉर्म मागे घेऊन नये यासाठी प्रयत्न केले
चिंचवड विधानसभा मतदारसंघात (Pune Chinchwad Bypoll Election) मला राहुल कलाटे (Rahul Kalate) आणि नाना काटे या दोघांनी उमेदवारी मागितली होती.
या दोघांतील एकाला उमेदवारी देण्यात यश मिळाले असते तर आम्ही यशस्वी झालो असतो.
दोन्ही मतदारसंघ हे भाजपचे आहेत. राहुल कलाटेंनी अपक्ष उमेदवारी अर्ज भरला नसता तर दोन्ही ठिकाणी आम्ही विजयी झालो असतो.
मी चिंचवडमध्ये राहुल कलाटेचा फॉर्म मागे घेण्यासाठी प्रयत्न केला. मात्र त्याने ऐकले नाही.
राहुल कलाटे याने फॉर्म मागे घेऊ नये म्हणून अनेकांनी प्रयत्न केले. मला याबाबत माहिती मिळत होती.
सत्ताधाऱ्यांनी सर्व यंत्रणांचा वापर करुन ही निवडणूक लढवल्याचा गौप्यस्फोट अजित पवार (Ajit Pawar) यांनी केला.

 

Web Title :- Pune Chinchwad Bypoll Election | maha vikas aghadi candidate nana kate reaction after chinchwad bypoll defeat

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Ravichandran Ashwin | रविचंद्रन अश्विनने मोडला कपिल देवाचा तो रेकॉर्ड; ‘हा’ कारनामा करणारा ठरला तिसरा खेळाडू

Kasba Bypoll Election Result | भाजपच्या बालेकिल्ल्यात काँग्रेसची मुसंडी, काँग्रेसचे रवींद्र धंगेकर 11 हजार मतांनी विजयी

Uddhav Thackeray | भाजपची निती वापरा आणि फेका, पोटनिवडणुकीच्या निकालावरुन उद्धव ठाकरेंचा भाजपवर घणाघात (व्हिडिओ)