Thane Crime Branch Police | जन आशीर्वाद यात्रेत खिसे कापणारी मालेगावची टोळी अटकेत; लाखोंचा ऐवज हस्तगत

ठाणे न्यूज : पोलीसनामा ऑनलाइन (Policenama Online) – Thane Crime Branch Police केंद्रीय राज्य मंत्री कपिल पाटील यांची दोन दिवसांपूर्वी जन आशीर्वाद यात्रा ठाणे जिल्ह्यात निघाली होती. या यात्रेत कोरोना नियमांचे उल्लंघन झाले होतेच पण गर्दीचा फायदा घेत चोरटयांनी भाजपच्या नेत्यांचे आणि कार्यकर्त्यांचे खिसे कापले होते. त्याच्या तक्रारी नजीकच्या पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आल्या होत्या. दरम्यान पोलिसांनी (Thane Crime Branch Police) या प्रकरणांचा तपास करून मालेगावच्या खिसे कापणाऱ्या टोळीला गजाआड करण्यात यश मिळवले आहे.

अबूबाकर उस्मान अन्सारी (वय ३५), नादित अन्सारी (३०), अतिक अहमद (५१) आणि अश्पाक अन्सारी (३८) अशी अटक केलेल्या चार आरोपींची नावे आहेत. त्यांच्याकडून लाखोंची रक्कम, १० मोबाईल असा सहा लाख ६९ हजाराचा मुद्देमाल आणि एक कार हस्तगत केली आहे.

चारही आरोपी जन आशीर्वाद यात्रेसाठी ठाण्यात आले होते.
यात्रेमध्ये त्यांनी अनेक कार्यकर्त्यांचे मोबाईल आणि काही रोख रक्कम चोरीला गेली.
ज्याची तक्रार जवळच्या पोलीस ठाण्यात करण्यात आली.
या प्रकरणी ठाणे गुन्हे शाखेच्या युनिट ५ ने खबऱ्याकडून मिळालेल्या माहितीनुसार दहिसर येथून या टोळीला अटक केली आहे.
ही टोळी लोकांचे खिसे कापण्यासाठी अशा गर्दीचा फायदा घेते.
चारही आरोपी सराईत असून त्यांच्यावर नाशिक, मुंबई आणि नवी मुंबईतील वेगवेगळ्या पोलीस ठाण्यात १२ गुन्हे दाखल आहेत.

 

Web Title : Thane Crime Branch Police | thane news theft bjp kapil patil jan ashirwad yatra nashik four arrested by police

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

BHR Scam | बीएचआरमध्ये ‘टेंडर’ भरणार्‍या अनेक व्यक्ती मुख्य आरोपीच्या ओळखीच्या; सुनील झंवरच्या कोठडीत वाढ

Pune Crime Branch Police | सराईत गुन्हेगाराकडून पिस्टल व काडतुस जप्त, गुन्हे शाखेची कारवाई

Pune Court | रविंद्र बर्‍हाटेचा मुक्काम औरंगाबाद येथील कारागृहातच; जाणून घ्या प्रकरण