Thane Crime | ठाणे शहरात एका दिवसात दोन गोळीबार; कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर?

ठाणे : पोलीसनामा ऑनलाइन – Thane Crime | राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांचा बालेकिल्ला आणि मतदार संघ असलेल्या ठाणे शहरात कायदा आणि सुव्यवस्था धाब्यावर बसवली गेली आहे. कारण, शुक्रवारी (दि. 21) रोजी एकाच दिवसात दोन गोळीबाराच्या (Firing In Thane) घटना ठाण्यात घडल्या आहेत. (Thane Crime)

 

आज सकाळी घंटाळी देवी मार्ग (Ghantali Devi Road) परिसरात गोळीबार झाला. या गोळाबारात एक व्यक्ती गंभीर जखमी झाली आहे. या घटनेची बातमी कळते न कळते तोपर्यंत दुसरी घटना वर्तक नगर (Vartak Nagar, Thane) परिसरात घडली. त्यामुळे ठाण्यातील पोलिसांवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. ठाणे पोलिसांचा गुन्हेगारांवर वचक नाही का, असा प्रश्न विचारला जातो आहे. तसेच मुख्यमंत्र्यांच्या ठाण्यात हा प्रकार घडल्याने नागरिकांत भितीचे वातावरण आहे. (Thane Crime)

 

पहाटे चार-पाचच्या सुमारास घंटाळी देवी मार्गावरील साईबाबा मंदिराजवळील परिसरात पहिला गोळीबार झाला. यावेळी तीन राऊंड फायरिंग करण्यात आली. या गोळीबारात एकजण जखमी झाला आहे. या तरुणाची प्रकृती गंभीर असून, त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. पोलिसांना घटनास्थळी एक जीवंत काडतूस हस्तगत झाले आहे. दुसरी घटना ठाण्यातील लोकमान्य नगर पाडा क्रमांक 4 येथे सकाळी 9 च्या सुमारास घडली. गणेश जाधव (Ganesh Jadhav) उर्फ काळ्या गण्या असे जखमी झालेल्या तरुणाचे नाव आहे. गणेश जाधव याची गुन्हेगारी पार्श्वभूमी आहे. याप्रकरणी वर्तक नगर पोलीस स्थानकात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

यापूर्वी देखील टोळीयुद्धातून ठाण्यात गोळीबाराच्या घटना घडल्या आहेत.
17 सप्टेंबर रोजी चितळसर पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका गाडीवर गोळीबार करण्यात आला होता.
यावेळी सुदैवाने कोणालाही दुखापत झाली नाही.
त्यानंतर 7 ऑक्टोबरला आर्थिक देवाण घेवाणीच्या वादातून कापूरबावडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत गोळीबार झाला होता.

 

Web Title :- Thane Crime | two firing incident in single day in cm eknath shinde home district raising law and order question

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Sanjay Raut | ईडीला कार्टाने झापले! संजय राऊत मीडियाशी बोलतात, तुमच्या का पोटात दुखतंय?

Rain In Maharashtra | मान्सून ‘या’ तारखेला घेणार निरोप, 6 जिल्ह्यांवर अस्मानी संकट

Pune Crime | न्यायालयाने फटकारल्यानंतर हडपसर पोलिसांनी बलात्कार प्रकरणी दाखल केला गुन्हा