Coronavirus : ठाण्यात ‘कोरोना’चा कहर ! गेल्या 24 तासात 1822 नवे पॉझिटिव्ह तर 43 जणांचा मृत्यू

ठाणे : पोलीसनामा ऑनलाइन – मुंबई आणि उपनगर भागात कोरोना व्हायरसने थैमान घातले आहे. या ठिकाणी कोरोनाचा प्रसार झपाट्याने वाढत आहे. ठाणे जिल्ह्यात देखील कोरोनाचा प्रादुर्भाव वेगाने वाढत असल्याचे दिसून येत आहे. शनिवारी ठाण्यामध्ये 1822 नवी रुग्णांसह 43 जणांचा मृत्यू झाल्याची नोंद करण्यात आली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील कोरोना बाधित रुग्णांची संख्या 65 हजार 927 इतकी झाली आहे. तर 1 हजार 870 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

ठाणे जिल्ह्यात आज कल्याण डोंबिवली महानगर पालिका क्षेत्रात 475 नवीन रुग्णांची तर 9 जणांच्या मृत्यूची नोंद झाली. त्यामुळे बाधितांची संख्या 15480 तर मृतांची संख्या 240 वर पोहचली आहे. ठाणे महानगर पालिका हद्दीत 342 रुग्णांसह 10 जणाच्या मृत्यूची नोंद झाल्याने कोरोना बाधित रुग्णांची संख्या 15516 झाली आहे. तर मृतांची संख्या 567 वर पोहचली आहे. नवी मुंबई महापालिका क्षेत्रात 352 नव्या रुग्णांसह 10 जणांचा मृत्यू झाला आहे. नवी मुंबईत कोरोना बाधित रुग्णांची संख्या 11 हजार 410 तर मृतांची संख्या 340 इतकी झाली आहे.

मीरा भाईंदर – 168 रुग्ण तर 4 जणांचा मृत्यू, एकूण रुग्ण 6408 मृतांची संख्या 219
भिवंडी महापालिका – 57 रुग्ण तर 2 जणांचा मृत्यू, एकूण रुग्ण 3063 मृतांची संख्या 175
उल्हासनगर – 148 रुग्ण तर 3 जणांचा मृत्यू, एकूण रुग्ण 5432 मृतांची संख्या 80
अंबरनाथ – 64 रुग्ण तर 4 जणांचा मृत्यू, एकूण रुग्ण 3030 मृतांची संख्या 116
बदलापूर – 66 रुग्ण, एकूण रुग्ण 1833 मृतांची संख्या 175
ठाणे ग्रामीण – 150 रुग्ण तर 1 मृत्यू, एकूण रुग्ण 4027 मृतांची संख्या 107